‘या’ पाच अभिनेत्रींची खरी नावं ऐकल्यावर तुम्हीही म्हणालं, ‘एवढी वर्ष येड्यात काढलं राव’


प्रसिद्ध कवी नाटककार शेक्सपिअरने विचारलेला ‘नावात काय आहे?’ हा अजरामर प्रश्न आजदेखील तितकाच भाव खाऊन जातो. याचे चांगले उदाहरण द्यायचे झाल्यास बॉलिवूडच्या कलाकारांचा उल्लेख येथे आपण निश्चितच करू शकतो. बॉलिवूडमध्ये असे कित्येक कलाकार आहेत, ज्यांनी प्रसिद्धीसाठी आपल्या नावात बदल केला आहे. यात बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीपासून ते डिंपल गर्ल प्रीती झिंटापर्यत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या नावात बदल करून प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. चला तर मग पाहुयात बॉलिवूडमधील या अभिनेत्री आणि त्यांची खरी नवे.

रेखा
रेखा या भारतीत चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि मोहक असा चेहरा आहे. आजदेखील त्यांच्या अदा पाहण्यालायक असतात. लोक अजूनही त्यांच्यावर तितकेच प्रेम करतात जितकं अगोदर करायचे. त्यांची स्टाईल आणि सौंदर्य कोणालाही मागे टाकेल असे आहे. दक्षिण भारतीय या अभिनेत्रीचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे. हे नाव बदलून त्यांनी रेखा हे नाव ठेवले. आपल्या खऱ्या नावापेक्षा त्या रेखा नावाने जास्त ओळखल्या जातात.

शिल्पा शेट्टी
बॉलिवूडची ‘धडकन गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी ही आपल्या अदा आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. शिवाय ती आपल्या फिटनेससाठी तितकीच प्रचलित आहे. चित्रपटात येण्याअगोदर तिने आपल्या नावात बदल करून शिल्पा हे नाव ठेवले. तिचे खरे नाव ‘अश्विनी शेट्टी’ हे आहे. आजसुद्धा ती याच नावावर प्रसिद्धी मिळवत आहे.

कियारा अडवाणी
कबीर सिंगमधून नावारूपाला येणारी अभिनेत्री कियारा अडवाणी ही आज प्रमुख अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या मोहक सौंदर्याने अनेकांना प्रेमात पडणाऱ्या या अभिनेत्रीचे खरे नाव ‘आलिया आडवाणी’ आहे. सलमान खानने तिला हे नाव बदलण्यास सांगितले होते.

प्रीति झिंटा
जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात करणारी प्रीति झिंटा ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. डिंपल गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या या अभिनेत्रीचे खरे नाव ‘प्रीतम सिंग’ हे आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक यशस्वी चित्रपट केले होते. त्यानंतर तिने आपल्या विदेशी बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न थाटले.

श्रीदेवी
दक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अभिनयाची चर्चा आजही होते. आज जरी त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांची गाणी जेव्हा वाजवली जातात, तेव्हा त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक अनेक हिट चित्रपट त्यांनी केले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर विदेशात देखील त्यांनी आपले नाव कमावले आहे. आज त्यांचे लाखो चाहते आहेत. श्रीदेवी यांचे खरे नाव ‘यम्मा यंगर’ हे आहे.

या अभिनेत्री शिवाय असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या नावात बदल केलेले आहेत. ज्यात सलमान खान, गोविंदा, टायगर श्रॉफ, जॉन अब्राहम, जॉनी लिव्हर, अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती यांचे नाव घेण्यास काहीच हरकत नाही. हे आज आपल्या खऱ्या नावपेक्षा बदललेल्या नावामुळे प्रसिद्ध झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-सनी देओलच्या ‘त्या’ एका चुकीमुळे वडील धर्मेंद्र यांना बसला होता कोट्यवधींचा फटका! वाचा तो किस्सा

-खऱ्या आयुष्यात अविवाहित असलेल्या ‘भाईजान’ने चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीसोबत केलंय सर्वाधिक वेळा लग्न, पाहा फिल्मी वेडिंग लिस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.