आपण बॉलिवूडमध्ये पाहिले, तर आपल्या लक्षात येईल अनेक कुटुंबातील लोकं या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक भावाबहिणीच्या जोड्या देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. बहुतेक करून आपण पाहिले तर अशा भावाबहिणींच्या जोड्यांपैकी सर्वच हिट होतात असे नाही. एक हिट होतात आणि एक फ्लॉप ठरतात. उदाहरण द्यायचे झाले तर काजोल आणि तनिषा, आमिर आणि फैजल, ट्विंकल आणि रिंकी, शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी. त्यामुळे कलाकारांना नेहमीच त्यांच्या भावंडांबद्दल प्रश्न विचारले जातात. असाच एक प्रश्न अरबाज खानला देखील एका मुलाखतीमध्ये विचारला गेला.

सध्या अरबाज खान त्याच्या ‘पिंच २’ या शोचा नवीन सीझन घेऊन आला आहे. या शोच्या पहिल्याच भागात दबंग सलमान खानने हजेरी लावली. या शोचे प्रमोशन करताना अरबाजला प्रश्न विचारला गेला की, “सलमान खान भाऊ होण्याचे काही नुकसान आहे का?” यावर उत्तर देताना अरबाज म्हणाला, “मला नाही वाटत की, सलमानचा भाऊ होणे ही नुकसान होणारी बाब आहे. खरंच पाहिले तर यात नुकसान होणारी गोष्ट कोणती? सलमानचा भाऊ असण्यामुळे अपेक्षा आपोआपच वाढतात. चुकीचे आहे. कारण हे क्षेत्र मी स्वीकारले आहे, माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. सलीम खान आणि सलमान खान ज्या क्षेत्रात आहे तिथे यायचे मीच ठरवले. मी कोणत्या दबावाखाली आहे किंवा मला कोणती चिंता आहे हे बघणे त्यांचे काम नाही. लोकं माझी तुलना कोणाशी करता याची मला पर्वा नाही. मी स्वतःच्या लढाया स्वतःच लढतो. हा देखील माझा एक प्रवास आहे. सलमान इतका मोठा स्टार आणि लोकप्रिय मी नाही, मात्र तरीही मी माझा प्रवास एन्जॉय करतो.”

सलीम खान यांना सलमान, अरबाज, सोहेल, अलवीरा, अर्पिता ही पाच मुलं आहेत. यांच्या पैकी सलमान सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. तसेच अरबाजच्या या शोच्या पुढच्या भागात अभिनेता आयुष्मान खुराणा हजेरी लावणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’
-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….










