Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी एकदम भारी! गुंजन सिंगचं भोजपुरी गाणं होतंय जोरदार व्हायरल, अवघ्या १० दिवसात मिळाले ५१ लाखांपेक्षाही अधिक हिट्स

एकदम भारी! गुंजन सिंगचं भोजपुरी गाणं होतंय जोरदार व्हायरल, अवघ्या १० दिवसात मिळाले ५१ लाखांपेक्षाही अधिक हिट्स

जेवढी क्रेझ बॉलिवूड गाण्यांची बघायला मिळते, तेवढीच क्रेझ हल्ली भोजपुरी गाण्यांचीही बघायला मिळत आहे. भोजपुरी लोकप्रिय गायक आणि सुपरस्टार गुंजन सिंग याला लग्नामध्ये जेवणात जमालगोटा खायला देण्याचा प्रयत्न केला गेला, आणि तो खूप रागावतो. पण मुलींनी त्याला समजावून सांगितले की, लग्नात एवढी मजा तर असतेच. या व्हिडियोमध्ये दाखवलेले पूर्णपणे फिल्मी आहे.

हे गाणे रिलीझ होताच गुंजन सिंगचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. गुंजन सिंगच्या या गाण्याला अवघ्या १० दिवसात ५१ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गुंजन सिंगच्या एंटरटेनमेंट या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर हे लग्नाचे गाणे रिलीझ करण्यात आले आहे. या गाण्यात गुंजन सिंग वराच्या धाकट्या भावाची भूमिका साकारत आहे.

या गाण्याच्या यशाने गुंजन सिंग खूप आनंदित आणि उत्साहित आहे. त्याने सर्व चाहत्यांचा आणि भोजपुरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल आभार मानले आणि म्हटले की, “चांगले गाणे तेच असते जे थेट तुमच्या मनाला स्पर्श करतात. माझे हे गाणे खूपच गोड आहे, जे तुमच्या सर्वांना खूप आवडते आहे.”

गुंजन सिंग पुढे म्हणाला, “मला खूप चांगले वाटले की, तुम्ही सर्व माझ्या गाण्याला आणि माझ्या अभिनयाला चांगला प्रतिसाद देत आहात. आशा आहे की, तुम्ही सर्वांनी त्याचप्रकारे आपले प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद पुढेही द्यावे.”

गुंजन सिंग याच्यासह अंतरा सिंग आणि प्रियांकानेही आपला आवाज दिला आहे. संगीत रोशन सिंग यांनी दिले आहे, तर गीत अमन अलबेला यांनी लिहिले आहे. हे गाणे राकेश सिंग मारू यांनी केले आहे. या भव्य व्हिडिओचे दिग्दर्शन सुशांत सिंग, कुमार चंदन यांनी केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीच्या नवीन गाण्याची धमाल, मिळाले लाखो हिट्स

-प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

-पहिल्यांदाच आशियाई सुपरहिरोवर मार्व्हल स्टुडिओने बनवला चित्रपट, तीनच दिवसात टिझरला मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा