×

अर्जुन कपूरने शेअर केले त्याचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो, म्हणाला ‘आता मी याच्या प्रेमात आहे’

बॉलिवूडमध्ये टिकण्याचा आणि यशस्वी होण्याच्या मूलमंत्रापैकी एक म्हणजे फिटनेस. या क्षेत्रात काम करण्यासाठी कलाकरांना त्यांचा फिटनेस खूपच जपावा लागतो. जर कलाकारांनी त्यांचा फिटनेस गमावला तर त्यांना काम मिळत नाही आणि मिळाले तर ते मनासारखे नसते. यासाठी कलाकार नेहमीच त्यांच्या फिटनेसची जरा जास्तच काळजी घेतात. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता अर्जुन कपूर देखील त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. लहानपणापासून अर्जुन खूपच बेढब होता, त्याचे वजन कमालीचे वाढलेले होते, असे असूनही त्याने त्याच्या फिटनेसवर काम केले आणि तो या क्षेत्रात आला टॉपचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला.

नुकतेच अर्जुन कपूरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अर्जुनाचा ट्रान्सफॉर्मेशन लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने त्याच्या अकाऊंटवरून आधी आणि नंतर असे दोन फोटो शेअर केले आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने त्याच्या १५ महिन्यांच्या फिटनेस प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. त्याने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याचे वाढलेले वजन दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याचे परफेक्ट ऍब्ज आणि फिट बॉडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाढलेल्या वजनाचा फोटो फेब्रुवारी २०२१ मधला असून, फिट बॉडीचा फोटो मे २०२२ मधला आहे. या दोन्ही फोटोंमध्ये त्याच्या फिटनेसमधला फरक स्पष्ट दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

त्याचे हे फोटो शेअर करत अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले, “वर्क इन प्रोग्रेसचे १५ महिने. हे खूपच सुंदर आहे. मात्र मी या फोटोला नंतर डिलीट करणार नाही, कारण मला माझ्या या प्रवासावर गर्व आहे. फेब्रुवारी २०२१ पासून मे २०२२ पर्यंतचा हा प्रवास खूपच कठीण होता. मात्र मला आनंद आहे की मी हे करू शकलो. या संपूर्ण प्रवासात टिकून राहणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. मात्र मागील ४ महिने मी ज्यातून गेलो त्यावर आता माझे प्रेम जडले आहे.”

पुढे अर्जुन कपूरने लिहिले, “मला अशा आहे की हे पुढे देखील असेच राहील. माझे मंडे मोटिव्हेशन आता मी स्वतःच आहे. मला अशी जाणीव होऊन काही काळ झाला आहे. हा मी आहे.” अर्जुन कपूरच्या या पोस्टनंतर त्याच्या इंडस्ट्रीमधील कलाकार मित्रांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. रणवीर सिंगने त्याच्या फोटोवर ‘हाय गर्मी’ लिहिले आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंग, परिणीति चोपड़ा, वरुण धवन आदी अनेक कलाकारांनी त्याच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

अर्जुनकपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचेच झाले तर तो सध्या मनालीमध्ये त्याच्या आगामी द लेडी किलर सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post