Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड बाबो! ‘रावणा’ने हेमा मालिनीच्या कानाखाली वाजवलेल्या 20 चापटा, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

बाबो! ‘रावणा’ने हेमा मालिनीच्या कानाखाली वाजवलेल्या 20 चापटा, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

छोट्या पडद्यावर आजपर्यंत ‘रामायण‘वर अनेक मालिका बनवल्या गेल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेची गोष्टच न्यारी होती. या टीव्ही मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. या मालिकेत जेवढी लोकप्रियता ‘राम’ हे पात्र साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मिळाली आहे, तेवढीच चर्चा ‘रावण’ साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचीही झाली होती. अरविंद यांनी त्यांच्या पात्रात जिवंतपणा आणला होता. मात्र, हेही तितकंच खरंय की, त्यांनी ‘रामायण’ याव्यतिरिक्त अनेक मालिका आणि सिनेमात काम केले होते. त्यामुळे सिनेसृष्टीतील त्यांचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. गुरुवारी (दि. 6 ऑक्टोबर) त्यांची पुण्यतिथी असल्याने यानिमित्त त्यांचा एक रंजक किस्सा जाणून घेऊया.

अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचा रंजक किस्सा बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी संबंधित आहे. अरविंद यांनी हेमा यांना एक- दोन नाही, तर तब्बल 20 चापटा मारल्या होत्या.

नेमकं काय घडलेलं?
खरं तर, 70च्या दशकात बनलेल्या ‘हम तेरे आशिक हैं’ या सिनेमात हेमा मालिनी आणि जीतेंद्र यांची जोडी झळकलेली. या सिनेमात अरविंद यांनीही काम केले होते. त्यांचा हेमा मालिनींसोबत एक सीन होता. या सीनमध्ये त्यांनी हेमा यांना जोरात चापट मारायची होती, पण त्यांना ते जमत नव्हते. हेमा यांना चापट मारताना अरविंद हे अस्वस्थ झाले होते. कारण, त्यावेळी हेमा या एक सुपरहिट अभिनेत्री बनल्या होत्या, त्यामुळे त्यांना या सीनवेळी एक- दोन नाही, तर तब्बल 20 रिटेक करावे लागले होते.

रामानंद सागर यांच्या मुलाने केलेला खुलासा
रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी एका मुलाखतीत या किस्स्याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, “मी त्यांना गुजराती मंचावरून घेतले होते. ते एक शानदार अभिनेते होते, पण त्यांना त्यांच्या भावाच्या सावलीखाली राहायला आवडायचे. त्यांनी ‘हम तेरे आशिक हैं’ या सिनेमात हेमा मालिनी यांच्यासोबत काम केले होते. या सिनेमात हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांचा एक सीन होता, ज्यामध्ये हेमा यांनी चापटा मारायच्या होत्या. त्यांना असे करण्यासाठी तब्बल 20 रिटेक घ्यावे लागले होते. त्यानंतर अभिनेत्री आणि मी त्यांना म्हटले की, तुम्ही हे विसरून जा की, त्या एक स्टार अभिनेत्री आहेत आणि सीन पूर्ण करा. त्यानंतर त्यांनी सीन व्यवस्थित केला होता.”

अशी मिळाली होती ‘रावणा’ची भूमिका
अरविंद यांचा जन्म मध्यप्रदेशात 8 नोव्हेंबर, 1938 रोजी झाला होता. त्यांनी अधिकतर काम गुजराती सिनेमात केले होते. मात्र, त्यांना जसे समजले की, रामानंद सागर ‘रामायण’ बनवत आहेत, तेव्हा ते तातडीने गुजरातहून मुंबईला रवाना झाले होते. त्यांनी या मालिकेत ‘केवट’ या पात्रासाठी ऑडिशन दिले होते. त्यावेळी ‘रावण’ या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांना पहिली पसंती होती. मात्र, रामानंद हे अरविंद यांची देहबोली पाहून हैराण झाले. त्यांनी लगेच अरविंद यांना ‘रावण’ या भूमिकेसाठी घेतले. त्यानंतर ही मालिका चाहत्यांच्या भेटीला आली, आणि यातील सर्वच पात्र साकारणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रख्यात गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक, प्रकृती अत्यंत गंभीर! जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

संजय मिश्रा यांना आयुष्यात बसला होता मोठा धक्का, लाज बाजूला ठेवत करायचे ‘हे’ काम

हे देखील वाचा