Friday, March 29, 2024

दुख:द! ‘रामायणा’तील रावण अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड, सहकलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

रामानंद सागर यांच्या अत्यंत लोकप्रिय पौराणिक मालिका ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री (५ ऑक्टोबर) या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अरविंद यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचे निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. यामुळे, ते बऱ्याच दिवसांपासून अंथरुणावर पडून होते. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती त्यांचा भाचा कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी अरविंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची माहिती देताना कौस्तुभ त्रिवेदी म्हणाला की, “मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. काका गेल्या काही वर्षांपासून सतत आजारी होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांची तब्येत थोडी खालावू लागली होती. अशा परिस्थितीत त्यांना दोन-तीन वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. ते महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि कांदिवली येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले.”

रामायण मालिकेतील राम या पात्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्वीट करत लिहिले की, “आध्यात्मिकरित्या रामावतार आणि सांसारिक एक अतिशय थोर, धार्मिक, साध्या स्वभावाचे व्यक्ती आणि माझे प्रिय मित्र अरविंद त्रिवेदी जी आज मानवी समाजाने गमावले आहेत. नक्कीच, ते थेट सर्वोच्च निवासस्थानी जातील आणि त्यांना भगवान श्री रामाचा सहवास मिळेल.”

सुनील लहरी यांनी अरविंद त्रिवेदी यांचे दोन फोटो शेअर केले आणि ट्वीट करत लिहले की, “अत्यंत दुःखद बातमी आहे की, आमचे लाडके अरविंद भाई (रामायणातील रावण) आता आपल्यात नाहीत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो … माझ्याकडे शब्द नाहीत, मी एक वडील, माझा मार्गदर्शक, हितचिंतक गमावला आहे.” दीपिका चिखलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘त्यांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करते …ते एक अद्भुत व्यक्ती होते ..”

अनेक मालिकांमध्ये केलंय काम
‘रामायण’ नंतर अरविंद त्रिवेदींनी आणखी अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले. ‘विक्रम और बेताल’ व्यतिरिक्त अरविंद यांची चमकदार कामगिरी अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या बहुचर्चित पौराणिक मालिकेत रावणाच्या पात्राने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिले आणि आजही लोक त्यांना त्याच पात्रासह आठवतात.

३०० हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये केलंय काम
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्षे गुजराती चित्रपटात काम केले. गुजराती प्रेक्षकांमध्ये त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आणि उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सन्मानितही करण्यात आले. अरविंद त्रिवेदींनी किमान ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

भाजपकडून जिंकली निवडणूक
अरविंद त्रिवेदी यांनी ‘रामायण’मध्ये रावणानंतर आणखी अनेक पात्रांमध्ये छाप सोडल्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी गुजरातमधील साबरकांठा येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. रावणाच्या पौराणिक पात्राच्या यशामुळे ते निवडणूकही जिंकले. १९९१ ते १९९६ पर्यंत ते लोकसभेचे खासदार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा