Saturday, June 29, 2024

आहा कडकच ना! ‘जवान’मधील ‘तो’ सीन सुरू होताच थेट चित्रपटगृहात तरूणाने केले प्रेयसीला प्रपोज, पाहा व्हिडिओ

गेल्या महिन्यात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीली आले. यातील गदर 2 चित्रपटाने प्रेक्षकांचे मत जिंकले आहे. हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर शाहरूख खानचा जवान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने सर्व चित्रपट गृह दणाणून सोडली आहेत. शाहरूख खानच्या या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चित्रपट बघायला आलेल्या एका चाहत्याने थेट चित्रपट गृहात प्रियसील प्रपोज केले आहे. या शाहरूखच्या चाहत्याने जवान (Jawan Movie) चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यातील रोमॅन्टिक सीन सुरु होताच केले प्रपोज. संपूर्ण भरलेल्या चित्रपट गृहातील गर्दीसमोर तरूनाने प्रपोज केले आहे. मुलील प्रपोज केल्याने टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर वाजलाया सुरूवात होते. . हा रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.
हा व्हिडिओ शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब या ट्विटर अकांऊटवरू शेअर करण्यात आला आहे.

जवान चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, ‘जवान’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 65.50 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली आणि चित्रपटाने केवळ 46.23 कोटींचा व्यवसाय केला. आता शाहरुख खानच्या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. ‘जवान’ने तिसऱ्या दिवशी 68.72 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 180.45 कोटी झाले आहे.

‘जवान’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देत आहेत. अवघ्या चार दिवसांत हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. रिलीज होताच ‘जवान’ने पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताब पटकावला. जवान हा कमाईच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. तर तो शाहरुख खानचा वर्षातील दुसरा ब्लॉकबस्टर ठरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. (As soon as the ‘To’ scene in ‘Jawan’ started, the young man proposed to his girlfriend directly in the cinema, the video went viral)

अधिक वाचा-
किरण मानेंनी शाहरुख खानसाठी शेअर केलेली पोस्ट व्हायरल; म्हणाले, ‘भावा तुझा स्पर्श…’
‘जिनिलीया पुन्हा गरोदर आहे?’, रितेश आणि जिनिलीयाचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

हे देखील वाचा