Saturday, September 30, 2023

‘जवान’च्या वादळात उडून गेला ‘गदर 2’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई

सनी देओलचा ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. या चित्रपटाने 500 कोटींचे कलेक्शनही केले होते. पण आता चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होताना पाहायला मिळत आहे. शाहरुख खानचा ‘जवान‘ 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल झाला आहे. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा प्रत्येक चित्रपटाला मोठा दणका सहण करावा लागत आहे. ‘जवान’ने ‘गदर 2‘ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

सनी देओलचा (Sunny Deol)  ‘गदर 2′(Ghadar 2) हा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन आठवड्यात 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तारा सिंग आणि सकिनाच्या स्टोरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. आता मात्र प्रेक्षकांनी त्यांचा मोर्चा शाहरूख खानच्या जवान चित्रपटाकडे वळवला आहे. शाहरूख खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्याचे चाहते देशातच नव्हे तर परदेशात देखील आहे. त्यामुळे जवानची क्रेझ प्रचंड आहे.

सनी देओलचा ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर जवळपास महिनाभर राज्य करत होता. ‘गदर 2’ने आधी आलेल्या सर्वच चित्रपटांना टक्कर दिली, पण आता ही राजवट संपुष्टात येताना दिसत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’च्या एंट्रीने गदर 2 बरबाद केला आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ हा 2023 सालातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. या यादीत ‘गदर 2’ चाही समावेश आहे, मात्र आता या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

‘गदर 2’ रिलीज झाल्याच्या दिवसापासून उत्तम कलेक्शन करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने फक्त 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, मात्र आता कमाई कमी झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ‘गदर 2’ने गुरुवारी सुमारे 1.50 नेट व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाने रिलीजच्या 28 दिवसांत आतापर्यंत 510.59 कोटी रुपयांचा निव्वळ व्यवसाय केला आहे. दुसरीकडे, जवान बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने देशभरात सुमारे 75 कोटींची कमाई केली आहे. (After the release of Jawan, Sunny Deol Ghadar 2 took a huge dip)

अधिक वाचा-
‘…म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाही’; प्राजक्ता माळीचे मोठे वक्तव्य
‘जवान’चा आयुष्मान खुरानाला दणका; ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या कमाईत 14व्या दिवशी मोठी घट

हे देखील वाचा