मराठीसोबतच हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवलेल्या अश्विनी भावे सध्या आहेत तरी कुठे?


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी मराठीसोबतच हिंदीचा पडदा देखील जोरदार गाजवला. ९० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीमधे अनेक अभिनेत्रींनी पदार्पण केले. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी देखील घातली. मात्र जेवढा गाजावाजा करून या अभिनेत्रींनी हिंदीमध्ये प्रवेश केला, तेवढ्याच लवकर त्या यातून बाजूला देखील झाल्या. याला अनेक अपवाद देखील आहे. मात्र या हिंदी सिनेसृष्टीमधे ९० च्या दशकात एका अशा मराठमोळ्या चेहऱ्याने प्रवेश केला, जो पाहून मराठीसह सर्वच प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले. तो चेहरा होता अश्विनी भावे यांचा. मात्र सध्या अश्विनी कुठे आहेत? काय करतात? असे अनेक प्रश्न त्यांच्या फॅन्सला असतील, चाल तर जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे.

अनेक मराठी सिनेमे केल्यानंतर ९० च्या दशकात अश्विनी यांनी हिंदीमध्ये प्रवेश केला. १९९१ साली अश्विनी यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत ‘हिना’ सिनेमातून हिंदीमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील अश्विनी यांच्यावर चित्रित झालेले गाणे ‘देर ना हो जाये’ खूपच हिट झाले होते. अतिशय उत्तम अभिनय, सौंदर्य यांच्या बळावर अश्विनी यांनी खूपच कमी वेळात हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्यांचे नाव तयार केले.

पुढे अश्विनी यांनी ‘सैनिक’, ‘बंधन’, ‘जज मुजरिम’, ‘युगपुरुष’, ‘अशांत’ आदी २० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. १९९८ साली अश्विनी फिल्म मेकिंगचा कोर्स करण्यासाठी अमेरिकेत गेल्या. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले. याच दरम्यान त्यांचे अमेरिकेतील सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या किशोर बोर्डिकर यांच्याशी लग्न झाले, आणि त्या अमेरिकेत सेटल झाल्या.

अमेरिकेत सेटल झाल्यानंतरही त्यांनी त्यांचे मराठीपण नेहमीच जपले आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक करत ‘ध्यानीमनी’, ‘मांजा’ असे हिट सिनेमे केले. अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. मात्र त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात.

अश्विनी भावे यांनी मराठीमध्ये ‘शाबास सुनबाई’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’, ‘गोलात गोल’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘अशी ही बनवाबनवी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.