Saturday, April 20, 2024

जगासमोर प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले, अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल.राहुल

मागील बऱ्याच काळापासून अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुल यांच्या नात्याबद्दल त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बातम्या येत होत्या. अथिया के.एल.राहुलसोबत इंग्लडमध्ये देखील क्रिकेट सामन्यांसाठी गेली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. पण त्यांनी कधीच जगासमोर त्यांचे नाते स्वीकारले नाही. मात्र के. एल. राहुलने जगजाहिररित्या ते नात्यात असल्याचे काबुल केले. त्यांचे नाते अधिकृत झाल्यानंतर अथिया आणि के.एल.राहुल पहिल्यांदाच मीडियासमोर सोबत दिसले. त्यांना सोबत पाहून फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती.

नुकताच सुनील शेट्टीच्या मुलाचा अहान शेट्टीच्या पहिल्या सिनेमाचा ‘तडप’चा ग्रँड प्रीमियर मुंबईमध्ये पार पडला. या प्रीमियर सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. मात्र अथिया शेट्टी आणि के.एल.राहुल यांनी हातात हात घालत एन्ट्री घेतली आणि संपूर्ण मीडियाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद दिसला. या प्रीमियरमध्ये सुनील शेट्टी त्याची पत्नी माना शेट्टी, अहान शेट्टी, अहानची गर्लफ्रेंड, अथिया शेट्टी आणि के.एल.राहुल या सर्वानी एकत्र येत फोटो सेशन देखील केले. ‘तडप’ सिनेमाच्या प्रीमियरला के.एल.राहुलची उपस्थिती खूपच काही बोलून गेली.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी अथियाने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी के.एल.राहुलने सोसहल मीडिया अकाऊंटवर तिच्यासोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करत लिहिले, “हॅप्पी बर्थडे माझे प्रेम” यासोबतच त्याने हार्टचे ईमोजी देखील पोस्ट केले होते. या पोस्टनंतर मीडियामध्ये त्यांच्या नात्याबद्दल सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लागला. यापोस्टवर नेटकऱ्यांनी अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच या जोडीला देखील शुभेच्छा दिल्या.

याच वर्षी जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट सिरिजदरम्यान के.एल.राहुल आणि अथिया सोबतच दिसले होते. बीसीसीआयकडे जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये के.एल.राहुलने अथियाला त्याचे जोडीदार म्हटले होते. दरम्यान अथियाने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये देखील दिसली, मात्र तिला अपेक्षित यश काही मिळाले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुकेश अंबानींच्या घरात दगडांसाठीही आहे एसी? अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने रंजक किस्सा केला शेअर

-असं कुणासोबतही होऊ नये! ‘एड्स’मुळे जीव गमावणारे प्रसिद्ध कलाकार, एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम मूस जट्टानाने व्हर्जिनिटीवर सोडले आपले मौन, दिला महिलांचा आदर करण्याचा सल्ला

हे देखील वाचा