Tuesday, June 25, 2024

‘चका चक’, म्हणत नवऱ्याच्या साखरपुड्यात तुफान नाचली सारा अली खान

कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागते ती सिनेमातील गाण्याची. आपल्या भारतीय सिनेसृष्टीमधे गाणी आणि संगीत याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे गाण्यांबद्दल प्रेक्षकांची क्रेझ लक्षात घेऊन सिनेनिर्माते देखील गाणी लवकरात लवकर प्रदर्शित करतात. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खानच्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

‘चका चक’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात साराचा अंदाज, तिचा डान्स, तिचा लूक आणि तिचे एक्सप्रेशन सर्वांनाच तिचे कौतुक करण्यास भाग पाडत आहे. या गाण्यात साराने नियॉन हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे. मोठे कानातले, बांगड्या आणि कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे.

या गाण्यात साखरपुडा होताना दिसत आहे. गाण्याच्या सुरुवातील सारा म्हणते, “मी देशातील पहिली पत्नी असेल जी आपल्या पतीच्या साखरपुड्यातच नाचेल.” आणि गाण्याची सुरुवात होते. गाण्याला साराच्या डान्सने एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. या गाण्याला श्रेया घोषालने आवाज दिला असून, ए. आर. रहमानने संगीत दिले आहे. तर या गाण्याचे शब्द इर्शाद कामिल यांचे असून, गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून, तशा कमेंट्स यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

‘अतरंगी रे’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अक्षय, सारा आणि धनुष यांचे त्रिकुट मोठ्या पडद्यावर सर्वाना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले असून, हा सिनेमा २४ डिसेंबर रोजी हा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा