Saturday, June 29, 2024

viral video sonu nigam : धक्कादायक! मुंबईत म्युझिक कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर झाला हल्ला

चित्रपटातील कलाकार असो की सिंगर सर्वांनाच एकदा तरी आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची इच्छा असते. तसेच आवडत्या कलाकाराला भेटून सेल्फी काढण्याचा मोह तर प्रत्येक चाहत्याला होतो. नुकतेच अभिनेता अक्षय कुमार आपल्या चित्रपट प्रमोशनसाठी पुण्यात आलेला असताना एका चाहत्याने बॉडीगार्डची नजर चुकवून चाहता अभिनेत्याजवळ गेला आणि त्याला मिठी मारली. परंतु सध्या कलाकारांसोबत धक्कादायक प्रकार घडून आल्याचे दिसून येत आहे. मुंबई येथील चेंबूर मध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होता. हा लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना गायक ‘सोनू निगम’ याला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.

गायक सोनू निगम (singer sonu nigam) याचा लाइव्ह कॉन्सर्ट होता तो संपल्यानंतर जेव्हा स्टेजवरून खाली उतरत असताना त्याच्यासह त्याच्या सोबत हिर आणि रब्बानी यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेल्फी घेण्यावरून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या धक्काबुक्कीच्या घटनेत गायकाला धक्का बुक्की करत असल्याचे लक्षात येतातच त्याचे सुरक्षारक्षक हिर आणि रब्बानी यांनी त्याला वाचवण्यासाठी आले. परंतु ते दोघेही त्या धक्काबुक्कीमुळे खाली पडले. गायकही पायऱ्यांवरून खाली पडला. तसेच त्याच्या सोबत असलेल्या सुरक्षारक्षकांना धक्का दिल्याने ते दोघेही स्टेज वरून खाली पडले. त्यांपैकी रब्बानी याला दुखापत झाली आहे. रब्बानी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोनू निगमने या हल्ल्यानंतर बोलताना म्हटलं की, “कॉन्सर्टनंतर स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला पकडलं आणि त्याने हिर आणि रब्बानी यांना धक्का दिला. ते दोघेही मला वाचवण्यासाठी आले होते. मी पायऱ्यांवर पडलो. मी याची तक्रार दाखल केली आहे. लोकांनी जबरदस्तीने सेल्फी आणि धक्काबुक्की पुन्हा करू नये यासाठी मी तक्रार केलीय. जर काही लोखंडाच्या सळ्या असत्या तर रब्बानीचा मृत्यू झाला असता अशा पद्धतीने त्याला धक्का दिला होता. व्हिडीओत दिसतं की मीसुद्धा खाली पडलो असतो.”

डीसीपी हेमराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव स्वप्निल फातर्पेकर असं आहे. त्याच्यावर धक्काबुक्कीचा आरोप करण्यात आले आहे. सोनू निगमने या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. धक्काबुक्की करत दुखापत केल्याचं आणि चुकीच्या पद्धतीने अडवल्याप्रकरणी गायकाने तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. (attack-on-singer-sonu-nigam-in-music-show-chembur-in-mumbai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा