चक्क आमीरपुढेच चिडलेल्या टॅक्सी चालकाने फाडले होते आमीरच्या सिनेमाचे पोस्टर, पुढे…

auto driver destroy bollywood actor aamir khan film poster juhi chawla qayamat se qayamat tak


बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचा चाहतावर्ग भलामोठा आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, त्याच्या पहिल्या ‘होली’ चित्रपटात त्याच्याकडे कोणाचे लक्षसुद्धा गेले नव्हते. या चित्रपटानंतर, आमिर खानच्या काकांनी त्याच्यासाठी एक चित्रपट बनविला, ज्यासाठी जूही चावलाला साइन केले गेले. हा चित्रपट होता ‘कयामत से कयामत’. बजेट कमी होते, म्हणून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही जास्त खर्च केला गेला नाही. आमिर खानने स्वत: या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी स्वीकारली होती. बाकी काही करता नाही आले, तरी चित्रपटाची किमान छोटी पोस्टर्स मुंबईतील ऑटो रिक्षामागे लावता येतील, असा सल्ला त्याने दिला.

आमिर खानने त्याच्या काही मित्रांसह मुंबईत टॅक्सी आणि ऑटोच्या मागे पोस्टर्स लावायला सुरवात केली. इतकेच नाही, तर आमिर पोस्टर लावताना टॅक्सी चालकांना सांगायचा की, मी या चित्रपटाचा नायक आहे, तुम्ही हा चित्रपट पाहायला नक्की जाव. असेच, एके रात्री आमिर खान आणि त्याचे दोन मित्र वांद्रे स्थानकावर पोहोचले, जिथे बरेच जण ऑटो लाईनजवळ उभे होते. त्यांच्यापैकी एका चालकाने पाहिले की, कोणीतरी त्याच्या ऑटोवर पोस्टर लावत आहे. हे पाहून तो चिडला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.

आमिरने त्या ऑटो चालकाची माफी देखील मागितली, पण तरीही तो शांत झाला नाही. त्यानंतर आमिरच्या मित्रांनी ती परिस्थिती सांभाळली, मात्र त्या ऑटो चालकाने आमिरसमोर त्याच्या चित्रपटाचे पोस्टर फाडले. याने आमिरचे मन खूप दुखावले गेले. पण जेव्हा आमिर आणि जूही यांचा ‘कयामत से कयामत’ हा चित्रपट रिलीझ झाला, तेव्हा चित्रपटाने यशाचा नवा विक्रम गाठला. या चित्रपटाने एकूण ८ फिल्मफेअर पुरस्कार आणि २ राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.

आमिरच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा १९९४ चा अमेरिकन चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रीमेक आहे. या चित्रपटात आमिर एका शीख व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि करीना कपूरही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लडाखमध्ये चालू आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.