विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि तृप्ति डिमरी यांचा आगामी सिनेमा ‘बॅड न्यूज’ १९ जूलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विक्की कौशल आणि तृप्ति डिमरी यांच्यासोबत अम्मी विर्क हा सुद्धा महत्त्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे. रिलीजच्या आधीच या सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. पण हा सिनेमा चर्चेत आहे, तो त्याच्या इंटीमेट सीन्समूळे.. या सिनेमाच गाणं ‘जानम’ में दोनों हे काही दिवसापूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. आणि या गाण्यात मोठ्या प्रमाणात इंटीमेट सीन्सचा वापर करण्यात आला आहे, त्यामूळे सिनेमा रिलीज करण्याच्या दोन दिवस आधी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शन यांना एक मोठा बदल करावा लागणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) यांनी फिल्म मेकर्सला काही इंटीमेट सिन्स वगळण्यास सांगितले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार सीबीएफसीने निर्मात्यांना सिनेमाच्या तीन वेगवेगळ्या भागातून इंटीमेट सीन काढून टाकण्यास सांगितले आहेत. ते दृश्य एकूण २७ मिनीटांचे आहेत, असं सांगितल जात आहे.
रिपोर्टनुसार सांगितले गेले आहे की या सिनेमाची सीबीएफसी समितीने तपासणी केली आहे. यानंतर विक्की कौशल आणि तृप्ति डिमरी यांच्यातील अतरंगी सिन काढून टाकण्यास सांगितले आहेत. सीबीएफसी दिलेल्या लिस्टनुसार सगळी दृश्य हे २७ सेकंदचे आहेत. रिपोर्टनूसार फिल्ममध्ये दाखवले गेलेला ‘लिप-लॉक’चे दृश्य सुद्धा एडिट करण्यास सांगितले गेले आहे. तसेच धूम्रपानाच्या सिन्सच्या वेळी फॉन्ट आकार वाढवण्यासाठी सीबीएफसीकडून सांगितले गेले आहे.
हे बदल करण्यासाठी ‘बॅड न्यूज ‘च्या निर्मात्यांना सीबीएफसी कडून यू/ए सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. सेंसर सर्टिफिकेटच्या अनुसार फिल्मचा अवधी १४२ मिनीट आहे. म्हणजेच हा सिनेमा २तास२२ मिनिटांचा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा श्रीदेवीने रजीनीकांतसाठी केला होता 7 दिवसाचा उपवास; मोठे कारण आले समोर
‘तो ओरडणारा किंवा रागावणारा नाही’, अक्षयसोबतच्या मतभेदांवर सुधा कोंगरा यांनी सोडले मौन