बॅालीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या सिनेमांसाठी ओळखला जातो.१२ जूलैला त्याचा सिनेमा ‘सरफिरा’ रिलीज झाला आहे. सिनेमाकडून बॅाक्स ऑफिसवर खूप अपेक्षा होत्या. पण हा सिनेमाची बॅाक्स ऑफिसवर हालत खूप खराब आहे. अक्षय कुमारच्या करीयरमध्ये लागोपाठ फ्लॅाप सिनेमे जोडत चालले आहेत. यातच फिल्मचे निर्देशक सुधा कोंगरा यांनी सेटवर अक्षक कुमार याच्यासोबत झालेल्या वादावादींवर भाष्य केले आहे.
मुलाखतीत सुधा यांनी अक्षयसोबत झालेल्या मतभेदांवर भाष्य केले आहे. अक्षय कुमारसोबत त्यांचे एकआठवड्यापासून सेटवर मतभेद चालू होते. त्या म्हणाल्या अक्षय हा त्याच्या विचारावर आडून बसला होता. त्याच्यानंतर फिल्मचे निर्माते विक्रम मल्होत्रा यांना यावे लागले आणि त्यांच्यातील भांडण सोडवावी लागली होती. आता हा मुद्दा सॅाल झाला असून सगळं नीट चालू आहे आणि काम नीट चालू आहे.
इंटरव्यूमध्ये पुढे सुधा यांना विचारण्यात आले की, “तुझा ‘सरफिरा’ सेट वरचा शुटींगचा पहिला दिवस कसा होता. आणि तिला काय वेगळा अनुभव आला त्यावर ती म्हणाली, “स्क्रिप्टला घेऊन आमच्या दोघांचे विचार खूप वेगळे होते. ते मला समजत होते. काही गोष्टी अश्या होत्या त्यात मी बदल करू शकत नाही, त्यामुळे मी त्यांच म्हणण मानत नव्हते. या स्थितीत विक्रम पुढे येऊन समजावत असे.पुढे ती म्हणते अक्षय आणि तिच्यात एक साम्य आहे कि त्यादोघांनाही सकाळी लवकर उठून काम करायला आवडते.”
सूधा म्हणाली अक्षयने ‘सरफिरा’ सिनेमात वीर म्हेस्त्रे या भुमिकेसाठी खूप कष्ट घेतले आहेत. सहा महिने सुधा मतभेदांमूळे अक्षयला समजू शकली नाही. तिने आता समजल आहे अक्षय रागवणारा किंवा आरडाओरडी करणारा नाही. त्या म्हणाल्या अक्षय जेव्हा रंगवतो तेव्हा तो १०० टक्के परफॉर्मन्स देतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘स्त्री 2’ चा ट्रेलर, श्रद्धा कपूरने पोस्ट करून दिली माहिती
जेव्हा श्रीदेवीने रजीनीकांतसाठी केला होता 7 दिवसाचा उपवास; मोठे कारण आले समोर