बादशाह हा एक प्रसिद्ध रॅपर आहे. अनेक उत्तम रॅपमुळे त्याने चहात्यांच्या मनात घर केले. करतो नेहमीच चर्चेत असतो मात्र सध्या एका सॉंग मुळे चर्चेत आहे. तर बादशाह नवीन हरियाणवी लोकगीत “तेहारी” वरून मोठ्या वादात आला आहे. अभय चौधरी यांनी बादशाहविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. काराण या गाण्यात अश्लील शब्द आणि दृश्ये आहेत, त्यामुळे हरियाणा महिला आयोगाने आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे. तर आता पंचकुला येथील सेक्टर 20 येथील सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये रॅपरविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. तर आता पंचकुला पोलिसांनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संबंधित व्हिडिओ काढून टाकण्यासाठी नोटिसाही दिली आहे.
या संदर्भात, पंचकुला येथील सायबर पोलिस स्टेशन सेक्टर 20 येथे भारतीय दंड संहिता च्या कलम 296 आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व कायदा, 1986 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत 6 मार्च 2026 रोजीच्या एफआयआर क्रमांक 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये शालेय गणवेश परिधान केलेल्या अल्पवयीन मुली त्यांच्या शाळेच्या बॅगा फेकून अभ्यासातून पळून जाताना दाखवल्या आहेत. “बादशाला” सारख्या शब्दांचा वापर शाळा आहे. शिवाय, गाण्यात महिला, मुलींबद्दल असभ्य शब्द आहेत.
पंचकुला पोलिसांनी बादशाहला (badshah)ताबडतोब पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी औपचारिक नोटीस बजावली आहे. आरोपीच्या अटकेची खात्री करण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत, पंचकुला पोलिसांनी हे गाणे यूट्यूब चॅनेलवरून काढून टाकले आहे. याव्यतिरिक्त, आक्षेपार्ह सामग्री पसरू नये म्हणून सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संबंधित व्हिडिओ काढून टाकण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
पंचकुला पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जर कोणी या वादग्रस्त गाण्याशी संबंधित रील्स किंवा व्हिडिओ तयार करून, शेअर करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करताना आढळले तर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करत आहेत. तर आता कायद्यानुसार पुढील कारवाई करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
विजयचे त्रिशासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, संगीताने न्यायालयात दाखल केली नवी याचिका


