Thursday, April 18, 2024

चित्रपटसृष्टीवर आणखी एक कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. अभिषेक चॅटर्जी 57 वर्षांचे होते आणि त्यांनी आज म्हणजेच 24 मार्च रोजी अखेरचा श्वास घेतला. माध्यमातील वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून ते खूप आजारी होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण (अभिषेक चॅटर्जी यांचे निधन) अद्याप समोर आलेले नाही.  माध्यमातील वृत्तानुसार, अभिषेक चॅटर्जी  23 मार्च रोजी एका शोचे शूटिंग करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ते शूटिंग सेटवर अनेकवेळा पडले, त्यानंतर शोच्या क्रू मेंबर्सनी त्यांची काळजी घेतली.

माध्यमातील वृत्तानुसार, आजारी असूनही अभिषेक चॅटर्जीला हॉस्पिटलमध्ये जाण्याची इच्छा नव्हती आणि ते सेटवरून घरी गेले. यानंतर त्यामच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले. त्यांना बरे वाटत होते, पण नंतर रात्री त्याची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

बंगाली सिनेमातील अनेक हिट चित्रपटांचा एक भाग असलेले अभिषेक चॅटर्जी सध्या बंगाली टीव्ही शो खोरकुटोमध्ये काम करत होते. या शोमध्ये त्यांच्यासोबत तृना साहा आणि कौशिक रॉय महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. अभिषेक चॅटर्जी यांच्या आकस्मिक निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टी तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अभिषेक चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिले की, “अभिषेक चॅटर्जी यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. अभिषेक अतिशय हुशार आणि त्याच्या कामगिरीमध्ये अष्टपैलू होता. आम्ही त्यांना मिस करू. त्यांच्या जाण्याने टीव्ही इंडस्ट्री आणि आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.” अशाच प्रकारे त्यांचे सगळे चाहते त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा