×

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे लग्नाचे फोटो व्हायरल, युजर्स विचारतायेत प्रेग्नेंसीबाबत प्रश्न

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शि बानी दांडेकर यांनी शनिवारी (१९ फेब्रुवारी) रोजी खंडाळामधील फार्महाऊसवर लग्न केले आहे. आता दोघेही अधिकृत एकमेकांचे जीवनसाथी बनले आहेत. त्यांच्या लग्नात केवळ त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्त उपस्थित होते. अशातच त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर त्यांचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, शिबानी लाल रंगाचा ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच फरहानने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. ते दोघेही खूप खुश दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहताच युजर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. त्यांचे फोटो पाहून युजर तिला प्रेग्नेंट आहेस का? असे प्रश्न विचारत आहेत.

हे फोटो पाहून सगळ्यांची नजर केवळ शिबानीवर खिळली आहे. तिचे पोट पुढे आलेले दिसत आहे. तिचे हे पोट पाहून युजर बेबी बंपबद्दल प्रश्न विचारत आहेत. अनेक लोक कन्फ्युज आहेत.

View this post on Instagram

A post shared by Glamour Alert (@glamouralertofficial)

हे फोटो पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, “ती प्रेग्नेंट आहे का?” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “आता लग्ना साठी शुभेच्छा द्यायच्या की प्रेग्नेंट सी साठी.” अशा प्रकारे तिच्या लग्नाच्या फोटो मुळे ती सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.

फरहान आणि शिबानी गेले ४ वर्ष रिलेशन मध्ये होते. कोरोनामुळे थांबले होते. त्यांच्या लग्नाला रिया चक्रवर्तीने हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :

Latest Post