सौंदर्यासह तंदुरुस्तीबद्दलही खूप सजग आहे अभिनेत्री भाग्यश्री मोटे; शीर्षासन करतानाच्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती

bhagyashree mote doing shirshasana in video see here


मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मोटे. ती सोशल मीडिया सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंनी ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय तिच्याबाबत आणखी एक खास गोष्ट म्हणजे, ती फिटनेसच्या बाबतीत बरीच सजग आहे. नुकत्याच तिने शेअर केलेल्या व्हिडिओवरून असे लक्षात येते की, भाग्यश्री सौंदर्यासह तिच्या तंदुरुस्तीबद्दलही खूप जागरूक आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती शीर्षासन करताना दिसली आहे. इतके अवघड आसन भाग्यश्रीने अतिशय सहजतेने सादर केले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती घरातच योगा करत आहे. अभिनेत्रीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

अलीकडेच भाग्यश्रीने एक पोस्ट शेअर करत, चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली होती. भाग्यश्री हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोना महामारीमुळे चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचे भाग्यश्रीने सांगितले.

भाग्यश्री ‘देवो के देव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या हिंदी, तर ‘देवयानी’, ‘प्रेम हे’, ‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेमध्ये दिसली आहे. याशिवाय ‘काय रे रास्कला’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनेत्रीने ‘चिकाटी गडीलो चिथाकोतूडू’ या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्रीचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतील, यात शंकाच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.