‘मैंने प्यार किया’ फेम ‘सुमन’ने लूटला घोडेस्वारीचा आनंद; चाहत्यांकडून मिळतंय भरभरून प्रेम


‘मैंने प्यार किया’मधील ‘सुमन’ आठवतेय का? का नाही आठवणार? या चित्रपटात आपल्या सोज्वळ भूमिकेने भाग्यश्रीने तुफान लोकप्रियता मिळवली. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी भाग्यश्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नुकताच तिने आपले दोन हटके फोटो शेअर केले आहेत, ज्याला चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळत आहे.

या फोटोत भाग्यश्री घोडेस्वारी करताना दिसत आहे. पांढऱ्या टी- शर्ट आणि काळ्या पँटमध्ये अभिनेत्री घोडेस्वारीचा आनंद लूटत आहे. (Actress Bhagyashree Shares Horse Riding Photos Fans Go Crazy Over Style)

व्हायरल होतोय भाग्यश्रीचा फोटो
भाग्यश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती घोड्यावर बसून जोरजोरात हसताना दिसत आहे. यादरम्यान तिच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत भाग्यश्री घोड्यावर बसून दुसऱ्या बाजूला पाहत आहे.

तिचे हे दोन्ही फोटो अप्रतिम आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. चाहते कमेंट करून तिची प्रशंसा करत आहेत. एकाने लिहिले की, “तुमच्या सर्वोत्तम क्षणांपैकी एक मॅम.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तरुण आणि सुंदर.” अशाप्रकारे कमेंट करत चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

‘थलायवी’ चित्रपटात झळकणार
भाग्यश्रीने ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. यामध्ये तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवले होते. या चित्रपटात भाग्यश्रीच्या कामाला आजही प्रेक्षकांकडून दाद मिळते. भाग्यश्री लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली होती. मात्र, मध्ये मध्ये ती टीव्ही आणि वेबसीरिजमध्येही झळकते. कंगना रणौतच्या ‘थलायवी’ या चित्रपटात ती झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.