Saturday, April 20, 2024

क्या बात है! भाईजान अन् इमरानमध्ये सुरू झाला मैत्रीचा नवा अध्याय, ‘टायगर ३’च्या सेटवर फुलतेय मैत्री

सध्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या अगोदरच्या दोन्ही भागात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर अभिनेत्री कॅटरीना कैफ देखील सलमान खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग तुर्कीमध्ये सुरू आहे. तुर्कीमधील शूटिंग झाल्यानंतर ‘टायगर ३’ची संपूर्ण टीम ऑस्ट्रियाला रवाना होणार आहे. या चित्रपटाचे काही ऍक्शन सीन्स आणि गाणी ऑस्ट्रियामध्ये चित्रीत केली जाणार आहेत. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण ६५ टक्के शूटींग पूर्ण झाले आहे. शूटींग पूर्ण झाल्यावर संपूर्ण टीम मुंबईला येईल. तर उर्वरित भागांचे शूटिंग मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये सेट तयार करून केली जाईल.

तर या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी देखील आहे. तो या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. इमरान हाश्मीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. जिममध्येे तो तासन् तास घालवून आपल्या शरीरावर मेहनत घेत आहे. त्याचा हा अंदाज यापूर्वी कोणत्याही चित्रपटासाठी पाहिला गेला नव्हता. त्याच वेळी, माध्यमांतील वृत्तानुसार, ‘टायगर ३’च्या शूटींग दरम्यान सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्यात खूप चांगले बॉन्डिंग तयार झाले आहे.

सलमान आणि इमरान सेटवर एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. एकमेकांसोबत काम करताना देखील त्यांना खूप मज्जा येत आहे. एका सूत्रानुसार, सलमान खान इमरान हाश्मीला खूप पसंत करत आहे. प्रत्येक शॉटनंतर तो त्याला प्रोत्साहन देत, त्याला पाठीवर कौतुकाची थाप देखील देत आहे. सेटवर हे दोघेही चांगले मित्र झाले आहेत.

तसेच, ‘टायगर ३’ च्या शूटिंगमधून ब्रेक घेतल्यानंतर सलमान खान देखील भारतात येऊ शकतो. खरं तर, ‘बिग बॉस १५’ हे २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि सलमान खान त्याच्या शूटींगसाठी परत येणार आहे. सलमान खान २७ सप्टेंबरला परत येऊ शकतो. त्याने स्वतः ‘बिग बॉस १५’ लाँचिंग दरम्यान पूर्व-रेकॉर्ड केलेल्या संदेशात माध्यमांसोबत खुलासा केला होता.

आगामी ‘टायगर ३’ हा चित्रपट सलमान खानच्या टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित २०१२ मध्ये पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ हा प्रदर्शित झाला होता. त्याचा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये दिग्दर्शक अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता. आता मनीष शर्मा ‘टायगर ३’ चे दिग्दर्शन करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य

हे देखील वाचा