Friday, April 19, 2024

भारती सिंगच्या मुलाने वेधलं चाहत्यांचं लक्ष, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकप्रिय कॉमेडीयन भारती सिंग हिने बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये मोलाचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच आपल्या बाळालाही साभांळत आहे. भारती सतत आपल्या मुलाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामध्ये भजनाच्या तालावर नाचत असतो आणि टाळ्या वाजवताना तर कधी हात जोडताना दिसत असतो. अशातच त्याच्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लक्ष पॅपरीझींना पाहून हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.

लोकप्रिय कॉमेडीयन आणि अभिनेत्री भारती सिंग (Bharti Singh) नुकतंच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. त्यावेळी अनेक पॅपरीझींना तिचे फोटो काढण्यासाठी घेरलं त्याेवळी तिच्यासोबत लक्ष्य देखिल होता. पॅपराझींनी लक्ष्य सोबत मस्ती करण्यास सुरुवीत केली तेव्हा लक्ष्यने सर्वांना गोड स्माइल दिली तेवढ्यात भारतीने त्याला “मामाला जय श्री कृष्ण म्हण” असं म्हणताच लक्षने केलेल्या त्या कृतीने सर्वांचेच मनं जिंकले.

 

View this post on Instagram

 

सोशल मीडियवर भारती सिगंच्या मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, “भारती तू खूप उत्तम आई आहेस, मुलाला खूप चांगले संस्कार देत आहेस.” तर दुसरऱ्याने लिहिले की, “भारतीजी तुम्ही मुलाला खूप चांगले संस्कार देत आहात.” तर एका अन्यने लिहिले की, “आमचा गोलू किती चांगला आणि संस्कारी बाळ आहे.” तर अनेकांनी जय श्री कृष्णा असेही लिहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर भारती सिगंच्या मुलाच व्हिडिओ ट्रेंड होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नानंतरही मंगळसुत्र अन् सिंदूरमध्ये दिसली नाही अथिया; युजर्स म्हणाले, ‘हिचे नक्की लग्न… ‘
‘आला थंडीचा महिना…’, रुबिना दिलैकचा कातिलाना अंदाज पाहिलात का?

हे देखील वाचा