बेबी बंप फ्लॉन्ट करत भारती सिंगने विचारला ‘असा’ प्रश्न, चाहत्यांनीही दिल्या भरभरून प्रतिक्रिया


प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) लवकरच आई होणार आहे. भारतीने नुकताच तिचा पती हर्ष लिंबाचियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये भारतीचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करून भारतीने नेटकऱ्यांना एक प्रश्न विचारला आहे, ज्याचे उत्तर देत तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

स्पष्ट दिसला बेबी बंप
या फोटोमध्ये भारती सिंगने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे, ज्यामध्ये त्याने पोटावर हात ठेवला आहे. या फोटोत भारतीसोबत तिचा पती हर्षही दिसत होता. हा फोटो शेअर करत भारतीने असा प्रश्न विचारला, ज्यावर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. (bharti singh shared baby bump latest picture asking this question to fans)

सांता येणार की सांती?
बेबी बंपचा फोटो शेअर करत भारती सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सांता येईल की सांती येईल? तुम्हाला काय वाटते ते मला लवकर कमेंटमध्ये सांगा.” यासोबतच भारतीने हार्ट इमोजीही बनवला आहे. भारतीच्या या पोस्टवर कमेंट करून तिचे चाहते तिच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत.

भारतीला व्हायचे नव्हते आई
काही काळापूर्वी एका स्पर्धकाने ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये परफॉर्म केले होते, जे पाहून भारती सिंग खूपच भावूक झाली होती. परफॉर्मन्सनंतर स्पर्धकाने सांगितले की, “मी स्टेजवर केलेला परफॉर्मन्स ही खरी घटना आहे. एका आईने आपले १४ दिवसांचे मूल कोरोनामुळे गमावले होते.” हे ऐकून शोमध्ये पाहुणा म्हणून आलेला अभिनेता सोनू सूदही भावूक झाला. भारती सिंग रडत रडत सोनू सूदला सांगते की, ती आणि हर्ष बाळाच्या प्लॅनिंगचा विचार करत होते, पण कोरोनामधील लोकांची स्थिती पाहून ती खूप घाबरली आहे. भारती सिंगने असेही सांगितले होते की, ती आतून मजबूत आहे, परंतु मूल गमावण्याचे दुःख ती सहन करू शकणार नाही.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!