Thursday, May 15, 2025
Home भोजपूरी अंकुश राजाचे ‘राजा तू बाड लईका’ गाणे रिलीझ; पाहायला मिळाला पल्लवी गिरीच्या रोमान्सचा तडका

अंकुश राजाचे ‘राजा तू बाड लईका’ गाणे रिलीझ; पाहायला मिळाला पल्लवी गिरीच्या रोमान्सचा तडका

भोजपुरी गायक अंकुश राजा हा त्याच्या उत्कृष्ट गायकीसाठी ओळखला जातो. लोकांना फक्त त्याची गाणी आवडत नाही, तर त्याचा अभिनयही चांगलाच आवडतात. अशा स्थितीत पुन्हा एकदा तो आपल्या गाण्यामुळे सध्या चर्चेत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याच्या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.

त्याच्या ‘राजा तू बाड लईका’ या नवीन गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर या गाण्यात अभिनेत्री पल्लवी गिरीने आपल्या रोमँटिक अदाकारीने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओ मधील तिचे ठुमके पाहून चाहत्यांचे भान हरपले आहे. कलाकारांच्या या अदाकरीमुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अंकुश राजाचे नवीन भोजपुरी गाणे ‘राजा तू बाड लईका’ हे गाणं वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. यामध्ये पल्लवी गिरी तिच्या सह-अभिनेत्यासोबत रोमँटिक दिसत आहे. एवढेच नाही, तर पल्लवी गिरीचे नृत्य पाहून लोक वेडे झाले आहेत. यामध्ये अदाकारी पाहून चाहते घायाळ होत आहेत. तसेच तिच्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

अंकुश राजाने या गाण्याला आपला सर्वोत्तम आवाज दिला आहे आणि हे गाणे अभिनेत्री पल्लवी गिरीवर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे बोस रामपुरी यांनी लिहिले आहे, तर संगीत प्रियांशु सिंग यांनी दिले आहे. (Impressed became a fan of actress Pallavi Giri’s performance, got so many views)

गाण्याचे संगीत अप्रतिम आहे, ते ऐकल्यावर सर्वांना नक्कीच नाचण्याची इच्छा होईल. रवी पंडित यांनी ‘राजा तू बाड लईका’ या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. ते त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर कोरिओग्राफी ऋतिक आराने केली आहे. त्याच्या उत्कृष्ट कोरिओग्राफीने व्हिडिओ खूप छान बनला आहे.

या गाण्याला एका दिवसातच वेळातच ४ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अंकुशच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी हे गाणं खूप वेळा ऐकल तरी त्यांचे मन भरत नाही.

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अंकुश राजाचे ‘मेरो कान्हा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये त्याने लोण्याचा केकसह एक व्हिडिओ शूट केला. त्याच्या या व्हिडिओला प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. चाहत्यांना ते खूप आवडले. या गाण्यासाठी अंकुश राजाने प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळवली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

हे देखील वाचा