Saturday, March 22, 2025
Home भोजपूरी भोजपुरी रॉकस्टार अरविंद अकेला कल्लूचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; यूट्यूबवर मिळतोय तूफान प्रतिसाद

भोजपुरी रॉकस्टार अरविंद अकेला कल्लूचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; यूट्यूबवर मिळतोय तूफान प्रतिसाद

भोजपुरी चित्रपट सृष्टीतील रॉकस्टार अरविंद अकेला कल्लू, ट्रेंडिंग गर्ल नीलम गिरी आणि सुंदर अभिनेत्री प्रियांका रेवडी हे कलाकार या दिवसात यूट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. नुकतेच त्यांचे एक मजेशीर व्हिडिओ साँग यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. त्यांच्या या नवीन गाण्याचे बोल ‘लैला नेनुआ आ आ आ’ हे आहे. या गाण्याला यूट्यूबवर प्रदर्शित होऊन अगदी काहीच तास झाले आहेत, पण या गाण्याला आतापर्यंत १ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. हे गाणे वर्ल्ड वाईड रेकॉर्डसच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. खूप कमी कालावधीत या गाण्याने एवढे व्ह्यूज मिळवले आहे. ( Bhojpuri rockstar Arvind Akela kallu’s new song release on YouTube)

प्रेक्षकांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिले आहे. हे सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या गाण्यातील कलाकार. त्यामुळे या गाण्याला लाखांमध्ये व्ह्यूज मिळत आहे. यावेळी वर्ल्ड वाईड रेकॉर्डसचे एमडी रत्नाकर कुमार हे म्हणाले की, “हे तर होणारच होतं. कारण या गाण्यात सर्व कलाकारांनी त्यांचे १००% योगदान दिले आहे. त्यामुळेच हे गाणे एवढे प्रसिध्द होत आहे.”

गाण्याच्या यशानंतर सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले. ते म्हणाले की, “जेव्हा आम्ही या गाण्याचे शूटिंग करत होतो, तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप मजा आली होती. हे गाणे कधी तयार झाले, हे आम्हाला देखील समजले नाही. प्रेक्षकांनी एवढ्या लवकर एक मिलियन व्ह्यूज देऊन आमच्या मेहनतीला यश दिले आहे. त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार! या सोबतच वर्ल्ड वाईड रेकॉर्डसचे एमडी रत्नाकर कुमार यांचे देखील खूप आभार! ज्यांनी आम्हाला एवढे छान गाणे दिले आहे. आशा करतो की, इथून पुढे देखील एवढेच प्रेम मिळेल.”

या व्हिडिओ साँगचे निर्माते रत्नाकर कुमार हे आहेत. तसेच अरविंद अकेला कल्लू आणि खुशबू तिवारी केटी यांनी हे गाणे गायले आहे. यादव राज हे या गाण्याचे गीतकार आहेत, तर एडी आर आनंद हे या गाण्याचे संगीतकार आहेत. तसेच दिग्दर्शक रवी पंडित हे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा