Saturday, April 20, 2024

रितेश अन् वर्षाच्या ‘या’ गाण्याचा यूट्यूबवर राडा; अभिनेत्याने सांगितले गर्लफ्रेंड सोडून गेल्याचे दु:ख

भोजपुरी चित्रपटसृष्टी झपाट्याने भरारी घेताना दिसत आहे. भोजपुरीतील चित्रपटांव्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओ दररोज प्रदर्शित होताना दिसतात. प्रेक्षकांच्या ओठांवर सहज रूळणारे शब्द या गाण्यांमध्ये पाहायला मिळतात. अशातच आता भोजपुरी अभिनेता आणि गायक रितेश पांडे आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणे घेऊन आला आहे. त्याच्या नवीन गाण्याचे नाव ‘गाली सी लगती है’ असून या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे प्रदर्शित होताच या व्हिडिओने यूट्यूबवर राडा घातला आहे.

‘गाली सी लगती है’ हे गाणे रितेश आणि वर्षा पंत यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात रितेशचा कव्वाली लूक चाहत्यांना भावला आहे. गाण्याला भव्यदिव्य पद्धतीने चित्रीत केले आहे. सोबतच या व्हिडिओत कलरफूल लाईटचा वापर केला आहे. कव्वाली गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्याने गर्लफ्रेंड सोडून गेल्याचे दु:ख सांगितले आहे. (Bhojpuri Actor Ritesh Pandey Bhojpuri Song Gaali Si Lagti Hai Release On Youtube)

या गाण्यात वर्षाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये तिच्या कातील अदांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. या गाण्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. चाहत्यांनी तिच्या लूक आणि डान्सला जोरदार पसंती दिली आहे. बॉलिवूडच्या धर्तीवर बनलेल्या या व्हिडिओचा इंटरनेटवर बोलबाला आहे.0

या गाण्याचा व्हिडिओ नव भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १४ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘गाली सी लगती है’ हे गाणे रितेश पांडेने गायले आहे. या गाण्याचे लिरिक्स आलम दिलशादने लिहिले आहेत. यासोबतच गाण्याला म्युझिक विनय विनायकने दिले आहे. व्हिडिओचे दिग्दर्शक हे राकेश ठाकर म्हणजेच राका आहेे. निर्माते राजेश गुप्ता असून गाण्याची कोरिओग्राफी साहिल मसीहने केली आहे. या गाण्याचे प्रोडक्शन मॅनेजर गुलशन आणि ब्रिजेश आहेत. व्हिडिओसाठी कास्टिंगचे काम राहुल गुप्तांनी केले आहे.

याव्यतिरिक्त रितेश पांडेचे नुकतेच नवरात्रीवरील ‘साथे घुमला पंडाल दिनभर देर कईला लभरवा’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऑडिओ व्हर्जनमध्ये प्रदर्शित केले होते. प्रदर्शित होताच, या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा