‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त अभिनेत्री अक्षरा सिंगचे नवे गाणे रिलीझ, चाहत्यांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद

Bhojpuri Actress Akshara Singh New Valentine Song Viral Watch


‘व्हॅलेंटाईन डे’ खास करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करत असतो. याबाबतीत सेलिब्रिटीही मागे हटत नाहीत. अशाच प्रकारे हा व्हॅलेंटाईन खास व्हावा यासाठी भोजपुरी अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंगने नवीन गाणे रिलीझ केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

अक्षरा सिंगने हे गाणे तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून अपलोड केले आहे. या गाण्यावर तिच्या चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अक्षराच्या चाहत्यांना हे गाणे तर आवडलेच आहे, परंतु चाहते तिच्या इंस्टाग्राम पोस्टलाही खूप प्रेम देत आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अक्षरा सिंग आतापर्यंत भोजपुरी संगीत उद्योगात जवळपास सर्व कार्यक्रमांमध्ये गाण्याच्या माध्यमातून दिसली आहे, परंतु ‘व्हॅलेंटाईन डे’ वरील तिचे हे पहिलेच गाणे आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूपच आवडले आहे.

अक्षरा म्हणाली की, “प्रेम चिरंतन आहे. माझे हे गाणे अशा प्रेमींसाठी आहे, जे एकमेकांवर खरोखर प्रेम करतात. हे गाणे त्यांना खूप आवडणार. कारण गाणे खूप रोमँटिक आहे. मला आशा आहे की माझे हे गाणे तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी संस्मरणीय असेल”.

अक्षरा सिंगचे हे व्हॅलेंटाईन खास गाणे भोजपुरीमध्ये नव्हे, तर हिंदीमध्ये आहे. ज्याला आतापर्यंत 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे बोल अजय बच्चन यांनी तयार केले आहेत, तर संगीत प्रियांशु सिंग यांनी दिले आहे. तसेच व्हिडिओ दिग्दर्शक पंकज सोनी आणि नृत्य दिग्दर्शक संजय कोर्वे आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.