‘तोंडात पान मसाला टाकून मामींना गाणी बोलायला लावतात अध्यक्ष महोदय’, अमृता फडणवीस नवीन गाण्यावर जोरदार ट्रोल

Amruta Fadnavis Troll On Her New Song Yeh Nayan Dare Dare


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. त्या आपल्या गाण्यांनी चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेताना अनेकवेळा दिसतात. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. अमृता फडणवीस यांचे नुकतेच एक गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्यामुळे त्या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत.

‘व्हॅलेटाईन डे’चे औचित्य साधून अमृता फडणवीस यांनी काल (१४ फेब्रुवारी) त्यांचे ‘ये नयन डरे डरे’ हे गाणे आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले. या गाण्याला आतापर्यंत २३ हजारांपेक्षाही अधिकवेळा पाहिले आहे.

या गाण्यावरून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. या गाण्याच्या कमेंटबॉक्समध्ये युजरनी कमेंट करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

एका युजरने लिहिले की, “मामींना कोणीतरी कानाच्या डॉक्टरने खंडणी दिली आहे का?”

यानंतर दुसऱ्या एका युजरने अमृता फडणवीस यांचे पती देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत लिहिले की, “तोंडात पान मसाला टाकून मामींना गाणी बोलायला लावतात अध्यक्ष महोदय.”

त्याचबरोबर एका युजरने लिहिले की, “मामाने अख्खा महाराष्ट्राच्या नयन, नयन मधून अश्रू काढलेत…त्याचं काय?” याव्यतिरिक्त एका युजरने डिसलाईकचे ऑप्शन बंद केल्यावरून अमृता यांच्यावर निशाना साधला. त्याने म्हटले की, “कशाला उगाच लोकांच्या कानाला त्रास देता मामी?, बरं ते dislike पण लपवले म्हणजे तुम्हाला तुमची लायकी समजली. मामी मंडल.

अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक गाणी म्हटली आहेत. त्यामध्ये ‘तेरी मेरी- फिर से’, ‘अंधार’, ‘तिला जगू द्या’, ‘फिर से’, ‘सड्डी गल्ली- रेल गाडी’, ‘सब धन माटी’ अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.