Tuesday, September 26, 2023

अक्षरा सिंगच्या सोनेरी साडीतील लूकवर नेटकरी फिदा, ट्रोलर्स देखील करताय लूकचे कौतुक

फोटोशूट हा कलाकारांचा खूप जवळचा विषय झाला आहे. अनेक अभिनेत्री फोटोशूट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. कलाकारांना फेमस होण्यासाठी हे एक मोठे माध्यम झाले आहे. प्रत्येक कलाकार त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंगने आज बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या हाॅट आवतारासाठी ओळखली जाते.

अक्षराने (Akshara Singh) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. पण ती हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सच्या मुलाखतीमुळे सतत चर्चेत येते. अक्षरा आजकाल भोजपुरी इंडस्ट्रीतील आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. प्रोफेशनल लाइफसोबतच ती सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. अक्षरा अनेकदा स्वतःच्या गाण्यांवर रील बनवतानाही दिसते. अक्षराला भोजपुरी व्यतिरिक्त इतर फिल्म इंडस्ट्रीही प्रचंंड आवड आहे.

अक्षराची ग्लॅमरस स्टाइल, सौंदर्य आणि किलर स्टाइल चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेशी आहे. अक्षराची शैली खूप चमकदार आहे. ती तिच्या नृत्य आणि गायनाने लोकांचे लक्ष वेधून घेते. अलीकडेच अक्षराने सोनेरी रंगाची साडी परिधान करून फोटो शेअर केले आहेत. यावर तिने सोनेरी रंगाचा चमकदार सीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. 31व्या वर्षीय अक्षराच्या सौंदर्याची आकर्षक शैली आणि फिटनेस अप्रतिम आहे. तिचे सौंदर्य राहून चाहते घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षराचा साडीतील लुक शानदार आहे, त्याचे आकर्षण वाढवण्यासाठी अभिनेत्रीने तिचा मेकअप खूप हलकासा केला आहे. त्याचबरोबर साडीला स्टायलिश टच देण्यासाठी तिने हातात कुंदनचे ब्रेसलेट घातलेले दिसत आहे. अक्षराचे इंस्टाग्रामवर 5.7 मिलियन फॉलवर्स आहेत. अक्षराचे हे नवीन फोटो पाहून चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘भोजपुरी इंडस्ट्रीची ब्यूटी क्वीन’ तर दुसर्‍याने लिहिले की, ‘अप्रतिम लूक’ तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा