‘चकाचक’मध्ये साराला कॉपी केल्यानंतर, सबा खानने भोजपुरी अभिनेता देवानंदसोबत केली धमाल; पाहा व्हिडिओ

खेसारी लाल यादव, पवन सिंग, रितेश पांडे, अंकुश राजा, प्रमोद प्रेमी, शिल्पी राज आणि अक्षरा सिंग यांची गाणी आजकाल खूप ट्रेंड करत आहेत. दरम्यान, भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकार देवानंदने त्याचे नवीन गाणे लाँच केले आहे आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित संगीत कंपनी वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरी यांनी ते गाणे प्रदर्शित केले आहे. देवानंदच्या गाण्याचे बोल ‘तोरा ससुरा में मोर ससुरार’ आहेत. ज्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सबा खान परफॉर्म करताना दिसत आहे.

‘तोरा ससुरा में मोर ससुरार’ गाणे आता चांगलेच चर्चेत आहे. ज्यामध्ये सबा (Saba Khan) पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही अंदाजात डान्स करताना दिसत आहे. सुरुवातीला ती पारंपारिक अवतारात दिसली आणि नंतर ती आधुनिक ड्रेसमध्ये दिसली. देवानंद देवही सह-कलाकारासह नाचताना दिसत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी बरेच मजेदार मूव्ह्ज करताना देखील दिसत आहेत.

वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स प्रस्तुत गाणे ‘तोरा ससुरा में मोर ससुरार’ हे रत्नाकर कुमार यांनी निर्मित केले असून, गीतकार ब्रिजेश कलेक्टर आहेत. छोटू रावत यांनी संगीतबद्ध केलेले असून, आर्यन देव यांनी दिग्दर्शन केले आहे. कोरियोग्राफीचे श्रेय अशोक सम्राट यांना जाते. या गाण्याआधी सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्या आगामी ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) या चित्रपटातील ‘चका चक’ गाण्यावर डान्स करून सबा खान प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मात्र, या गाण्यात सबाला तिच्या बोल्ड स्टाईलमुळे खूप ट्रोल करण्यात आले आहे.

‘चका चक’ या गाण्याच्या डान्स व्हिडिओमध्ये सबा स्पोर्ट ब्रामध्ये डान्स करत तिच्या बोल्डनेसची झलक दाखवताना दिसली. तिने श्रेया घोषालच्या गाण्यावर सारासारखे मूव्ह्ज दाखवण्याचा प्रयत्न केला, पण युजर्सना तिचा डान्स आवडला नाही. एका युजरने सबाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये लिहिले, “आता तुम्हीही सोफिया हयातसारखे कपडे उतरवायला शिकलात..” दुसऱ्याने कमेंट केली, “तुम्ही मुस्लिम आहात सुधारा.” एकाने लिहिले, “मुस्लिम नाव काढून टाका.” अशाप्रकारे अनेक युजर्सने तिला ट्रोल केले आहे. मात्र, अनेकांनी तिच्या डान्सचे कौतुक केले आहे.

हेही वाचा-

Latest Post