Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी भोजपुरी अभिनेत्रीने नवीन गाण्यातून सांगितली बॉयफ्रेंड बदलण्याची नवीन पद्धत; व्हिडिओला १४ लाख हिट्स

भोजपुरी अभिनेत्रीने नवीन गाण्यातून सांगितली बॉयफ्रेंड बदलण्याची नवीन पद्धत; व्हिडिओला १४ लाख हिट्स

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अक्षरा सिंग. ती केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नाही, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ती चित्रपटसृष्टीत आणि संगीत क्षेत्रात नेहमीच धुमाकूळ घालत असते. तिची गाणी देखील भोजपुरी संगीतप्रेमींना खूप आवडतात. ती आता पुन्हा एकदा तिच्या भोजपुरी संगीत प्रेमींसाठी एक नवीन गाणे घेऊन आली आहे. या गाण्याचे बोल ‘लडकों से खाया है धोका’ हे आहेत. (Bhojpuri queen akshara Singh’s new song release on YouTube)

स्वर ओरिजनल भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर अक्षरा सिंगचे हे रॅप साँग प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला चांगले यश मिळत आहे. या गाण्यात ती बॉयफ्रेंड बदलण्याची नवीन पद्धत सांगताना दिसत आहे. हे गाणे 14‌ जूनला यूट्यूबवर प्रदर्शित झाले होते. आतापर्यंत या गाण्याला 14 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या रॅप साँगमध्ये अक्षरा सिंग खूपच हॉट दिसत आहे. तिचा या गाण्यातील लूक आणि स्टाईल पाहून प्रेक्षक खूप आकर्षित झाले आहेत.

विष्णू विशेष यांनी या लोकप्रिय गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर प्रियांशु सिंग यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. सुशांत चंदन हे या गाण्याचे व्हिडिओ दिग्दर्शक आहेत. भोजपुरी प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडत आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘एक्स्प्रेशन क्वीन’ अक्षरा सिंग आणि अभिनेता अमरीश सिंग यांच्या ‘लव्ह मॅरेज’ या चित्रपटातील ‘चुरुर मुरुर खटियावा’ हे भोजपुरी गाणे यूट्यूबवर प्रदर्शित झाले होते. या गाण्यातील अमरीश आणि अक्षराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या गाण्यात देखील अक्षरा सिंग खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. गुप्ता प्रोडक्शन एंड स्टुडिओच्या बॅनरखाली बनलेल्या ‘लव्ह मॅरेज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू शंकर बेलू हे होते. तसेच राम कोमल गुप्ता हे या चित्रपटाचे निर्माते होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स

एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा