Wednesday, July 3, 2024

जाळ अन् धूर संगटच! रितेश पांडे आणि अक्षरा सिंगच्या नव्या गाण्याची यूटुबवर चलती, लाखो हिट्सचा होतोय वर्षाव

सध्या रोजच नवनवीन भोजपुरी गाणे येत आहेत. रोज एक तरी गाणे प्रदर्शित होतच आहे. असे असूनही सर्वच भोजपुरी गाणे सुपर डुपर हिट होतात. या गाण्यांनी त्यांचा एक वेगळा प्रेक्षक निर्माण केला आहे. आधी फक्त बिहार, उत्तरप्रदेश पुरता मर्यादित असणारी ही गाणे आता मात्र संपूर्ण देशात धुमाकूळ घालताना दिसतात.

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे हिट गाणे दिलेला भोजपुरी अभिनेता रितेश पांडे आणि आपल्या मनमोहक अदांनी लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षरा सिंग यांचे नवीन गाणे यूट्यूबवर धमाल करत आहे. ही जोडी आणि या गाण्यातील या दोघांचा जबराट डान्स लोकांना खूप आवडत आहे.

‘दुगो एतवार होई तहिया’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे ‘दबंग दमाद’ चित्रपटातील आहे. हे धमाकेदार गाणे प्रियांका सिंग आणि रितेश पांडे यांनीच गायले असून, सुमित सिंग चंद्रवंशी यांनी लिहिले आहे, तर छोटे बाबा बसही यांनी याला संगीत दिले आहे.

वेब म्युझिक यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ५/६ लाख व्युज मिळाले आहे.
दरम्यान रितेश पांडे यांचे ‘हॅलो कोन’ हे गाणे सुपर हिट झाले होते. या रॅप सॉन्गला आतापर्यंत ७०० मिलियन पेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत. सोबतच रितेशच्या अनेक गाण्यांना १०० मिलियनपेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत.

अक्षरा सध्या दिनेश लाल यादवसोबत रायबरेलीच्या शीवगड़ पॅलेसमध्ये तिच्या आगामी ‘जान लेबू का’ या भोजपुरी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाचे निर्माता श्रेय श्रीवास्तव आहे.

हे देखील वाचा