बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच आता भोजपुरी चित्रपटसृष्टीही चांगली चर्चेत आहे. भोजपुरी गायक दरदिवशी आपली नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. यामध्ये आता आणखी एका गायकाच्या नावाचा समावेश झाला आहे. तो गायक म्हणजेच अरविंद अकेला कल्लू होय. अरविंद आणि प्रियांका पंडित यांचे नवीन भोजपुरी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. (Bhojpuri Singer Arvind Akela Kallu Alka Jha And Actress Priyanka Pandit Song Aara Zila Ke Rangila Release On Youtube)
अरविंद अकेला कल्लूच्या प्रदर्शित झालेल्या नवीन गाण्याचे नाव ‘आरा जिला के रंगीला’ असे आहे. हे गाणे अरविंदच्या ‘राधे’ या सुपरहिट चित्रपटातील आहे.
या गाण्यात अरविंदसोबत प्रियांका पंडित दिसत आहे. ती आपल्या डान्स आणि हॉट अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अरविंदच्या मोठ- मोठ्या मिश्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या गाण्यात देशी अंदाज एकदम ठासून भरला आहे. हे गाणे भव्य दिव्य पद्धतीने शूट केले आहे. ज्यामध्ये अनेक कलाकार दिसत आहेत.
अरविंदचे ‘आरा जिला के रंगीला’ हे गाणे बुधवारी (२३ जून) एसआरके म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. काही तासातच या गाण्याने हजारो व्ह्यूजचा आकडा पार केला आहे.
‘आरा जिला के रंगीला’ हे गाणे अरविंद आणि अल्का झा या प्रसिद्ध भोजपुरी गायकांनी गायले आहे. अरविंदच्या ‘राधे’ चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर याचे दिग्दर्शन रितेश ठाकूर यांनी केले आहे. चित्रपटाच्या निर्मात्या नेहा श्री या आहेत. राधे चित्रपटातील गाण्याला रितेश ठाकूर यांनीच संगीत दिले आहे. या गाण्याचे लिरिक्स अरुण बिहारी यांनी लिहिले आहेत.
या सुपरहिट चित्रपटात अरविंद अकेला कल्लू, प्रियांका पंडित यांच्याव्यतिरिक्त रवी किशन, नेहा श्री, सीमा सिंग, मोहिनी घोष यांसारखे अनेक मोठे कलाकार आहेत. या चित्रपटात रवी किशन मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘या’ चित्रपटातील भोजपुरी गाणे ‘नयन बा नशीला’ गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यात रवी किशन यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यालाही प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस
-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष