एकदम झक्कास! गोलू गोल्डचे नवीन गाणे रिलीझ; पाहायला मिळाला ‘ट्रेंडिंग गर्ल’चा भन्नाट परफॉर्मन्स

भोजपुरीमधील प्रसिद्ध गायक गोलू गोल्ड याची अनेक नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षक त्याच्या गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच त्याचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे चांगलेच सुपरहिट होत आहे. त्याच्या प्रत्येक गाण्यालाच भोजपुरी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते. त्यामुळेच त्याचे प्रत्येक गाणे मोठ्या संख्येने व्हायरल होते. आता त्याचे ‘दिल हा की नोकरी सरकार के’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

शनिवारी (२३ ऑक्टोबर) गोलू गोल्डचे ‘दिल हा की नोकरी सरकार के’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे वर्ल्डवाईड रेकॉर्डस भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले आहे. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित होताच या गाण्याला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लवकरच हे गाणे एक मिलियन व्ह्यूज टप्पा गाठणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Bhojpuri singer golu gold and neelam giri song Dil ha ki nokari sarkar ke release on you tube)

गोलू गोल्डसोबत खुशबू तिवारीने या गाण्याला तिचा आवाज दिला आहे. तसेच या गाण्यात ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरी भन्नाट परफॉर्मन्स करत आहे. तिचे हे गाणे काही मिनिटातच सर्वत्र व्हायरल झाले आहे. या गाण्यात नीलम गिरी आणि गोलू गोल्ड यांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. हे गाणे या दोघांवर बॉलिवूड स्टाईलमध्ये शूट केले आहे. या गाण्याचे लेखक सोनू सरगम आहेत. तसेच आर्य शर्मा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तसेच भोजपुरीया हे या गाण्याचे दिग्दर्शक आहेत.

नवरात्रीच्या निमित्ताने गोलू गोल्ड आणि नीलम गिरी यांचे आणखी एक ‘चुनरिया सासराम’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. या गाण्याचे चित्रीकरण देखील गोलू गोल्ड आणि नीलम गिरी यांच्यावर केले होते. हे गाणे नवरात्री निमित्ताने प्रदर्शित झाल्याने गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्याचे आता प्रदर्शित झालेले गाणे देखील भोजपुरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट

-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Post