Thursday, March 28, 2024

Bhojpuri Song। नीलकमल अन् श्रृष्टीच्या केमिस्ट्रीने बहरलं गाणं, युट्यूबवर २ दिवसात मिळाले ‘इतके’ हिट्स

अभिनेता आणि गायक नीलकमल सिंग आणि श्रृष्टी उत्तराखंडी ही भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडींपैकी एक जोडी आहे. या दोघांचे कोणतेही गाणे प्रदर्शित होताच, धमाल केल्याशिवाय राहत नाही. चाहत्यांची त्यांच्या प्रत्येक गाण्यासाठी नेहमीच उत्सुकता ताणलेली असते. अशात त्यांचे नवीन गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नीलकमल सिंग (Neelkamal Singh) आणि श्रृष्टी उत्तराखंडी (Shrishti Uttrakhandi) यांच्या प्रदर्शित झालेल्या नवीन गाण्याचे नाव ‘सईयां जी दिलवा मांगेले गमछा बिछाइके’ (Saiyan Ji Dilwa Mangele gamcha Bichai ke) असे आहे.

‘सईयां जी दिलवा मांगेले गमछा बिछाइके’ या गाण्यामध्ये नीलकमल आणि श्रृष्टी यांची शानदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तसेच, त्यांच्या डान्स मूव्हजनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. या गाण्याचे संगीत आणि व्हिडिओ दिग्दर्शनही कमालीचे आहे. हे गाणे टी- सीरिजच्या हमार भोजपुरी या युट्यूब चॅनेलवर शुक्रवारी (दि. २४ जून) प्रदर्शित करण्यात आले आहे. या व्हिडिओला दोन दिवसात तब्बल ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

‘सईयां जी दिलवा मांगेले गमछा बिछाइके’ हे गाणे नीलकमल सिंग (Neelkamal Singh) आणि शिल्पी राज (Shilpi Raj) यांनी गायले आहे. तसेच, हे गाणे श्रृष्टी उत्तराखंडी या अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याबाबत बोलायचं झालं, तर गाण्याचे बोल आशुतोष तिवारी यांनी लिहिले आहेत. तसेच, गाण्याचे संगीत विकास यादव यांनी दिले आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन पवन पाल यांचे आहे, तर कोरिओग्राफी गुलाम रिझ्वी यांनी केली आहे. याव्यतिरिक्त सहाय्यक कोरिओग्राफर अमित चावला आहेत.

नीलकमल सिंग याचे ‘हे’ गाणेही घातलंय धुमाकूळ
नीलकमल सिंग याच्या गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे ‘मरे के ठेकाण लागल बा’ हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यात तो अभिनेत्री झोया खान हिच्यासोबत दिसला होता. या गाण्याला युट्यूबवर ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

हे देखील वाचा