Monday, June 24, 2024

‘तुमच्या सगळ्या खानदानाला उद्ध्वस्त करेल’, लालेबुंद झालेल्या खेसारी लालने चॅनल आणि पत्रकारांना दिली धमकी

भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव या दिवसात खूपच धमाल करताना दिसत आहे. एका नंतर एक अशी अनेक सुपरहिट गाणी देऊन तो भोजपुरी संगीत क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवत आहे. एकीकडे खेसारी लालचे सोशल मीडिया वरील फॅन फॉलोविंग, तर दुसरीकडे त्याच्या गाण्यांची लोकप्रियता यामुळे सध्या त्याचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. पण तो आता त्याच्या गाण्यांमुळे नाही तर त्याच्या रागामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो खूप रागावलेला दिसत आहे. त्याने मीडिया आणि यू ट्यूब कंटेंट क्रिएटर्सला खुलेआम धमकी देखील दिली आहे.

खेसारी लालने ३ जूनला एक फेसबुक लाईव्ह केले होते. ज्यामध्ये तो खूपच रागावलेला दिसत होता. त्याने त्याच्या या लाईव्हमध्ये न्युज चॅनल, पेपर, यू ट्यूबवर व्हिडिओ बनवणारे कंटेंट क्रिएटर्स यांना धमकी दिली आहे. त्याने म्हंटले की, “माझ्या बाबत कोणी चुकीची बातमी दिली, तर त्याला काय त्याच्या पूर्ण खानदानाला तो सोडणार नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करेल एवढे प्रेम करेल की, त्याला ते प्रेम नको होईल.”

https://www.facebook.com/watch/?v=172595291474146

तो पुढे म्हणाला की, “माझा फोटो आणि माझं नाव वापरायच्या आधी एकदा माझी परवानगी घ्या, नाहीतर मी त्या न्यूज चॅनलला कुठे घेऊन जाईल या गोष्टीचा तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही. तुमच्या चॅनलला उडवायला मला अजिबात वेळ लागणार नाही. तुमच्या पूर्ण परिवाराला मी घेऊन जाऊ शकतो.”

खेसारी‌ लालला एवढ्या रागात पाहून त्याचे चाहते खूप हैराण झाले आहेत. पण त्याच्या या रागामागचे नक्की कारण काय असावे, हा सर्वांना प्रश्न पडला आहे. तर काही दिवसांपूर्वी खेसारी लालचे ‘चाची‌ की बाची सपना मे आती हैं’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याच्या लिरिक्स वरून मोठा वाद उभा राहिला. हे गाणे ऐकणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, खेसारी लाल चाचीचे नाव घेऊन भाचीला कसे काय स्वप्नात बोलवत आहे.‌ या गाण्याच्या धूनवर पंकज सिंग नावाच्या एका व्यक्तीने खेसारी लालच्या मुलीवर गाणे तयार केले आणि गायले. यामुळे खेसारी‌ लालने लाईव्ह येऊन, यू ट्यूबवर असे व्हिडिओ बनवणाऱ्यांना त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी छापणाऱ्या पत्रकारांनाही धमकी दिली.

या प्रकारणानंतर खेसारी लालने पंकज सिंगच्या आई वडिलांकडे पोलीस पाठवले होते. लोकं असे म्हणतात की, पंकजने स्वतः या बाबतीत त्याची खूप वेळा माफी मागितली होती. तेव्हा त्याला मारझोड करण्यात आली, तसेच त्याच्या आई वडिलांना देखील चुकीची वागणूक दिली गेली. आता लोकांचे असे म्हणणे आहे की, या सगळ्यात पंकजच्या आई वडिलांची काय चूक होती. खेसारी लालने स्वतः देखील अनेक व्यक्तींवर गाणी बनवली आहेत.

 

हे देखील वाचा