खेसारी लाल यादवचे ‘चाची की बाची सपने में‌ आती हैं’ गाणे रिलीझ, मिळाले ३३ लाखांपेक्षा अधिक हिट्स

Bhojpuri star khesari Lal Yadav's new song release


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव याची भुरळ तर आज संपूर्ण भारतात आहे. भोजपुरी चित्रपटाचे चाहते त्याच्या अभिनयासोबत त्याच्या लूकचे देखील दीवाने आहेत. खेसारी लाल याचे नाव ज्या गाण्यासोबत जोडलं जात ते गाणं सुपरहिट होणार यात काहीही शंका नसते. मागच्या वर्षीपासून त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. त्याच्या गाण्यासोबतच त्याच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांना भरभरून प्रेम दिले. तो एक गायकासोबत एक उत्तम अभिनेता देखील अहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याच्या गाण्यांमुळे तर त्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नुकतेच त्याचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

खेसारी लालचे ‘चाची की बाची सपने मे आती हैं’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याच्या या गाण्याला 33 लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे आदिशक्ती फिल्म्स या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले आहे. या गाण्याला भोजपुरी प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. खेसारीने हे गाणे गायिका अंतरा सिंग सोबत मिळून गायले आहे. तसेच या गाण्याचे चित्रीकरण खेसारी लाल यादव आणि अभिनेत्री अनिषा पांडे यांच्यावर झाले आहे. या गाण्याचे लिरीक्स अखिलेश कश्यप यांनी लिहिले आहे ते श्याम सुंदर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याला आदीशक्ती फिल्म्सने त्यांच्या अकाऊंटवरून शेअर केले आहे.

या आधी खेसारी लाल याचे ‘हम तुम्हारे है सनम’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे देखील खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्याला अवघ्या काही तासातच 1 मिलियन एवढे व्ह्यूज मिळाले होते. या गाण्यात खेसारी लाल खूपच स्टायलिश दिसत होता.

खेसारी लाल हा खूप लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. त्याने त्याच्या आयुष्यात खूप मेहनत केली आहे. त्या जोरावर त्याने यश मिळवले आहे. त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याने यूट्यूब किंगचा पुरस्कार मिळवला आहे.

खेसारी लाल लवकरच त्याच्या ‘राजा की आयेंगी बारात’ आणि ‘वास्तव’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची खूप वाट पाहत आहेत. नुकताच त्याचा ‘लिट्टी चोखा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.