[rank_math_breadcrumb]

ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन; चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

भरत कपूर हे एक ज्येष्ठ अभिनेते होते. आणि त्याच्याबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. तर त्याचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यानी ‘हिंदुस्तान की कसम’, ‘सोने पे सुहागा’ आणि ‘बलिदान’ यांसारख्या चित्रपटांमधील सहाय्यक भूमिकांसाठी भरत कपूर ओळखले जात होते. तर त्यांची जाण्याने सर्वांना दुःख होत असून त्यांना त्यांच्या चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर ही त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या जवळचे मित्र अभिनेते अवतार गेली यांनी ही बातमी दिली आहे. तर त्यांचं निधन सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने झाली आहे

भरत (bharat)कपूर यांच्या निधनाची बातमी देताना, अभिनेते आणि जवळचे मित्र अवतार गिल यांनी मि़डीयाला सांगितले, “मला भरतजींचा मुलगा राहुलचा फोन आला. राहुलने मला कळवले की, दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे घरी निधन झाले. भरत गेल्या तीन दिवसांपासून आजारी होते. मी त्यांना 50 वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होतो. आम्ही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले आणि चित्रपटांमध्येही एकत्र काम केले. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहीलो आहोत. पण तो आता आपल्यात नाही याचे प्रंचड दु:ख आहे.

भरत कपूरने 1972 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जवळपास चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. त्याचे अनेक उत्तम चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तसेच त्यानी अनेक मालीकामध्येहि आपलीनन छलक दाखवली होती. माहीतीनुसार आता सायन हॉस्पिटलजवळील स्मशानभूमीत संध्याकाळी 6 वाजता भरत कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

संजय दत्त महिला आयोगाच्या सुनावणीला उपस्थित, गाण्याच्या वादाबद्दल माफी मागितली; ५० मुलींच्या शिक्षणासाठी निधी देणार