खेसारी लाल यादवने नवीन गाण्यात केला दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स; २४ तासात मिळाले ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव हा सध्या भोजपुरी संगीत क्षेत्रामध्ये खूपच धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्याची लागोपाठ गाणी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियता सध्या गगनाला भिडली आहे. खेसारी लालने त्याच्या आयुष्यात खूप मेहनत घेऊन आज हे यश मिळवले आहे. याचे श्रेय फक्त आणि फक्त त्यालाच जाते. संगीत क्षेत्रात येण्याआधी त्याने त्याच्या आयुष्यात अनेक कामं केली आहेत. पण त्यातून त्याला काही यश मिळाले नाही. पण आज तो आख्खी भोजपुरी चित्रपटसृष्टी गाजवत आहे. खेसारी लालची गाणी प्रदर्शित होता क्षणीच सुपरहिट होत असतात. अशातच त्याचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याच्या या गाण्याने यूट्यूबवर अक्षरश: धमाल केली आहे. सोबतच या गाण्याने रेकॉर्डही केले आहेत. (Bhojpuri superstar khesari Lal Yadav’s new song release on YouTube)

त्याचे ‘नाच के मलकीनी’ या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला 24 तासातच 36 लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा आकडा मिनिटा गणिक वाढतच चालला आहे. हे गाणे सारेगामा हम भोजपुरी यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. प्रेक्षक त्याच्या या गाण्याला जोरदार प्रतिसाद दर्शवत आहेत.

या गाण्याच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते राजकुमार यांच्या अंदाजात खेसारी लाल डायलॉग म्हणताना दिसत आहे. ‘नाच के मलकिनी’ हे एक डिस्को साँग आहे. या गाण्यात तो एक नव्हे तर दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या गाण्यात त्याच्यासोबत हॉट पाखी हेगडे आणि सिझलिंग आकांशा दुबे या दोन अभिनेत्री दिसत आहेत. खेसारी या गाण्यात शर्टलेस झाला आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे. पाखी हेगडे आणि खेसारी लाल यांनी अनेक गाण्यात एकत्र काम केले आहे. नेहमी प्रमाणेच या गाण्याला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

हे गाणे खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांनी एकत्र मिळून गायले आहे. आर्या शर्माने या गाण्याला संगीत दिले आहे. विशाल भारती यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शक गुंजन सिंग कश्यप हे आहेत. पीआरओ रंजन सिन्हा हे आहेत. तसेच लकी विश्वकर्मा यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.