Sunday, December 3, 2023

कार्तिक आर्यनकडून ‘भूल भुलैय्या 3’ची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सध्या कार्तिक आर्यनला अपेक्षित असे यश मिळत नाही. २०२२ साली त्यांना भूल भुलैया सिनेमाच्या रूपात मोठे यश पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर त्याचे सिनेमे सतत फ्लॉप होत आहे. अशातच आता भूल भुलैयाच्या निर्मात्यांनी एक निर्णय घेतला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता भूल भुलैया ३ या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर कार्तिक आर्यनने त्याच्या फॅन्ससोबतच या सिनेमाचा एक टिझर शेअर करत हा सिनेमा येणार हे नक्की केले आहे. लवकरच आता प्रेक्षकांना भूल भुलैया ३ हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. कार्तिकने शेअर केलेल्या ५७ सेकंदाच्या टीझरमध्ये कार्तिक आर्यन पुन्हा भुतिया हवेलीच्या आत दिसत आहे. यातच त्याचा एक दमदार संवाद ऐकायला मिळतो. कार्तिक म्हणतो, “काय वाटले होते गोष्ट संपली? दरवाजे तर बंद होतातच उघडण्यासाठी” पुढे कार्तिक म्हणतो, “मी आत्मांसोबत बोलत नाही तर माझ्यात आत्मा येतात देखील.”

या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आता लोकंच्या यावर प्रतिक्रिया येतात असून, अनेकांनी हा सिनेमा येणार म्हणून आनंद व्यक्त केला आहे. एकाने लिहिले, “ही आजची बेस्ट न्यूज आहे” दुसऱ्याने लिहिले, “हा सिनेमा सुपरहिट होणार” अनेकांनी त्याला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा अनिस बजमी करणार असून, हा हॉरर सिनेमा २०२४ साली प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा