अक्षय कुमार हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो त्याच्या नवनवीन गोष्टी, चित्रपट त्यासाठी चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला हा सध्या चर्चेत आहे. कारण दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे. तसेच जेव्हा जेव्हा विनोदी चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचे नाव सर्वात आधी घेतले जाते. या जोडीने आतापर्यंत उत्तम चित्रपट दिले आहेत.
अक्षय कुमार (kumar)आणि प्रियदर्शन हि जोडी आता 14 वर्षांच्या दीर्घ काळानंतर, 10 एप्रिल 2026 रोजी ‘भूत बंगला’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित हा चित्रपट तयार झाला आहे. आधुनिक हॉरर-कॉमेडी प्रकारात एक नवीन मैलाचा दगडही प्रस्थापित करण्यास आता हा सज्ज झाला आहे.
अक्षय कुमार अभिनीत भूत बंगला हा चित्रपट असुन या चित्रपटाचीनसर्वात मोठी ताकद त्याच्या स्टारकास्टमध्ये आहे. अक्षय कुमारसोबत परेश रावल, राजपाल यादव, असरानी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये ‘हेरा फेरी’ आणि ‘भूल भुलैया’बद्दलची उत्सुकता पुन्हा जागृत केली आहे. तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला एक वेगळाच दर्जा मिळतो. तसेच चित्रपटातील पहिले गाणे, ‘राम जी आके भला करेंगे’, याच्या यशानंतर निर्मात्यांनी आता त्याचे दुसरे गाणे, ‘तू ही दिसदा’ प्रदर्शित केले आहे. तर हे नवीन गाणे अक्षय कुमार आणि वामिका गब्बी यांच्यातील सुंदर केमिस्ट्री दाखवते. अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांच्या भावपूर्ण आवाजातील हे गाणे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘क्रिमिनल जस्टिस’वर भारी ठरलेली हि सिरीज, 2 वर्षांपासून ट्रेंडिंग, तर आता येतोय नवा सीझन


