Sunday, September 27, 2026
Home › कॅलेंडर › ‘तू पुन्हा आलास मला त्रास द्यायला’, पाहा भूमी पेडणेकरने कुणाला खडसावलंय

‘तू पुन्हा आलास मला त्रास द्यायला’, पाहा भूमी पेडणेकरने कुणाला खडसावलंय

पहिल्याच चित्रपटात आपल्या वजनदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. सध्या भूमी अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भूमीने नुकताच तिचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. ह्या फोटोत भूमी जरा नाराज दिसत आहे.

भूमीने तिचा एक सेल्फी शेयर करत तिला पिंपल आल्याचे सांगितले आहे. आता पिंपल्स हा मुलींचा अगदी नाजूक आणि नकोसा वाटणारा विषय आहे. भूमीने तिचा पिंपल दाखवत एक फोटो शेयर करत लिहिले, ‘ओ हॅलो तू पुन्हा मला त्रास देण्यासाठी आलास.’

मुलींना पिंपल्स आले की मुली ते लपवण्यासाठी किंवा जाण्यासाठी अनेक गोष्टींचा सहारा घेत असतात. भूमी सध्या याचं टेन्शनमधून जात आहे.

भूमीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर भूमी सध्या राजकुमार रावसोबत ‘बढाई दो’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. भूमीने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटातील पात्रांची माहिती देत, शूटिंग सुरु झाल्याचे सांगितले.

भूमीचा शेवटचा सिनेमा म्हणजे ‘दुर्गामती’ होता. हा सिनेमा OTT प्लँटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमीच्या पात्राचे खूप कौतुक झाले. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. आता ‘बढाई दो’ चित्रपटातून भूमी कोणत्या रूपात आणि भूमिकेत प्रेक्षकांसमोर येते हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल.

हे देखील वाचा