Thursday, April 18, 2024

हुक्का पार्लरच्या छाप्यात सापडला बिग बॉस विजेता मुनावर फारुकी, पोलिसांनी केले अटक

बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी (Munnawar Faruqui) आणि इतर 13 जणांना काल रात्री फोर्ट परिसरातील हुक्का बारवर छापा टाकल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर सर्व आरोपींना सोडून देण्यात आले.

मुनावर फारुकी हा एक प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आणि रॅपर आहे. काल रात्री दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. हर्बलच्या नावाखाली तंबाखूयुक्त हुक्का ओढत असल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी मुनावर फारुकीसह डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.

याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या टीमला हर्बलच्या वेषात तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर हुक्का बारवर छापा टाकण्यात आला. वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ञांना बोलावले होते.” अटक करण्यात आलेल्यांमध्ये फारुकी यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वांना सोडून देण्यात आले आहे. अलीकडेच मुनवर फारुकीने बिग बॉस सीझन 17 जिंकला आहे. हा शो जिंकल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वयाच्या 35 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने केले होळीचे टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर झाली ट्रोल
सुप्रिया श्रीनेटच्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगनाचा पलटवार, सोशल मीडियावर दिले सडेतोड उत्तर

हे देखील वाचा