‘अभिनेता बनण्यासाठी आलोय, पॉर्नस्टार नाही’, इंटिमेट सीनवर ‘बिग बॉस’ फेम पारस छाबडाचे वक्तव्य


आजच्या काळात चित्रपट, मालिका, वेबसिरीज हिट होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी सर्रास बोल्ड आणि इंटिमेट सीन्सचा वापर करतात. अशा सीन्समुळे त्याची मीडियामध्ये जोरदार चर्चा होते. कधी कधी पब्लिसिटी म्हणून देखील असे सीन्स चित्रपट, मालिका, वेबसीरिज यांमध्ये वापरले जातात. आताच्या काळात हिट आणि प्रसिद्ध होण्याचा हाच एक मार्ग असल्यासारखे सर्व कलाकार असे सीन्स करायला सहजपणे तयार होतात. मात्र, या इंडस्ट्रीमध्ये असे देखील काही कलाकार आहे. ज्यांना यश मिळवण्यासाठी अशा सीन्सची गरज नाही.

सध्या टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस’ सिझन १३ मधील स्पर्धक पारस छाबडा देखील याच संदर्भातील त्याच्या वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आला आहे. सध्या पारस अनेक म्युझिक व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक टीव्ही शो मधून झळकलेल्या पारसला बिग बॉसमुळे तुफान लोकप्रियता मिळाली. बिग बॉसनंतर त्याला विविध शो, मालिका, वेबसीरिज ऑफर होत आहेत. याच संबंधित एका मुलाखतीमध्ये पारसने काही खुलासे केले आहेत.

पारसला मनोरंजनाच्या सर्वच माध्यमात काम करायचे आहे. याला वेबसीरिज काही अपवाद नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पारसने त्याच्या मनातील एक गोष्ट बोलून दाखवली आहे. त्याने सांगितले की, “मला मागच्या काही काळापासून विविध प्रोजेक्ट्स ऑफर केले जात आहेत. मात्र, हे प्रोजेक्ट्स बोल्ड कंटेंट असलेले आहेत. काही प्रोजेक्ट्समध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आहे. मी या क्षेत्रात एक अभिनेता बनायला आलो आहे, पॉर्नस्टार नाही. कोणत्याही प्लेटफॉर्मवर अशा सीन्ससाठी मर्यादा नसतीलही. मात्र, मला माझ्या मर्यादा आहेत.”

पुढे तो म्हणाला, “माझ्या मते अशा सीन्सचा आणि कथेचा काहीही संबंध असतो. हे सीन फक्त प्रेक्षक आणि मीडियामध्ये बज तयार करण्यासाठी वापरले जातात.”

पारसने पुढे माहिरा आणि त्याच्या नात्यावर बोलताना सांगितले की, “मला माहिरासोबत लग्न करायचे आहे. मी आणि माहिरा खूप चांगले मित्र आहोत. बराच वेळ आम्हीसोबत घालवत असतो. मी आणि माहिराने मोहालीमध्ये तिच्या बिल्डिंगमध्येच एक घर देखील घेतले आहे. माझी इच्छा आहे की, आमचे नटे नैसर्गिक पद्धतीने पुढे जावे.”

पारसच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी तो रुबीना दिलैकसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता. माहिरा शर्मा आणि त्याने देखील अनेक व्हिडिओमध्ये काम केले आहे. लवकरच पारस एका शोमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्याने ‘बढ़ो बहू’, ‘हमारी अधूरी कहानी’ आणि ‘कर्ण सगिनी’ या काही मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


Leave A Reply

Your email address will not be published.