Friday, April 19, 2024

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात बोल्डनेसचा तडका; ‘त्या’ बोल्ड प्रोमोवर संतापले नेटकरी

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Big Boss Marathi season 4) कधी येणार याची उत्सुकतास चाहत्यांमध्ये दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथा सीझन 2 ऑक्टोबरला चालू होणार आहे. यंदा ‘ALL IS WELL’ अशी बिग बॉसची थीम आहे. झलक दिसत आहे. त्यामुळे आता हे स्पर्धक असतील याचा अंदाज चाहते लावत आहेत. टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस मराठी प्रसिद्ध आहे. कारण सुरू होण्याआधीच ‘बिग बॉस मराठी’ ट्रोल होत आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनच्या ग्रॅण्ड प्रीमिअरचे दोन प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यातील एका व्हिडिओमध्ये एक तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. तिच्या अदा, तिचा नखरा, लूकने सर्वांचेच लक्ष ही तरुणी वेधत आहे. चेहरा दिसत नसला तरी अंदाज लावता येऊ शकतो. मात्र, हा प्रोमो नेटकरांना फारसा आवडलेला नाही. या प्रोमोवर नेटकरी भडकले आहेत. त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

नेटकरांनी म्हटलेयं की, ”दिलखेचक नाही दिलटोचक वाटतेय अदाकारी’, तर दुसऱ्या एका नेटकऱ्यांने असे म्हटले की, ‘असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये ..आम्ही सर्व जण सोबत टीव्ही बघतो. खूप खराब…माझा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा बघतो ..तो हसत होता …मी काहीच बोलू शकले नाही ..स्वामी समर्थ सिरीयलच्या ब्रेकमध्ये ही घाणेरडी जाहिरात आली ..कृपया भान ठेवा’. दुसऱ्या एका युजरने लिहिले कि, “शी काय फालतूपणा लावलाय हा, मराठी बिग बॉस आहे हॉलिवूड नाही, मराठी बिग बॉसने लाज बाळगा, साऊथच्या कलाकारांकडून आणि साऊथच्या बिग बॉसकडून जरा चांगले वागायला शिका”. तर एका यूजरने म्हटलंय, “मराठी बिग बॉस आहे तर मराठी गाणी लावा, नाहीतर बंद करा ते बिग बॉस”.

सुरु होण्याआधीच बिग बॉस मराठीने नेटकऱ्यांनी दाखवली आहे. या प्रोमोवर नेटकरी जरी नाराज व्यक्त केली असेल, तरी दुसरीकडे काही नेटकऱ्यामध्ये या व्हिडिओतील ती स्पर्धक कोण आहे याचीही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भेडिया’ चित्रपटाचा टीझर रिलीज, बघा वरुण धवनचा खतरनाक लूक

कानाखाली मारु का? नेहा कक्करवर भडकला अनू मलिक

हे देखील वाचा