Tuesday, July 9, 2024

रुबीनाचा मोठा खुलासा; पती अभिनवसोबत वाटायचे असुरक्षित, केला होता घटस्फोटाचाही विचार

कपल्स हे अनेकदा केवळ नातं टिकवण्यासाठी त्यांच्या समस्या जगापासून ते लपवून ठेवतात. ते सारखे अत्यंत सुखी असल्यासारखं दाखवतात. मात्र, हे असं नातं खरंच चांगलं असतं का? अनेक जण म्हणतील की, ते नातं जपतायत ही खूप मोठी गोष्ट आहे, पण नातं जपण्यापेक्षा त्या नात्यामध्ये प्रेम असणे चांगलं नाही का? जर नात्यात प्रेमच नसले, तर अशा नात्याचा उपयोग तरी काय?, आणि हाच विचार काही कपल्स करतात आणि आपण आहोत तसे ते दाखवतात. अशातच आता अभिनेत्री रूबीनाने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे रुबीना दिलैक. ‘बिग बॉस १४’च्या रियॅलिटी शोची विजेती ठरलेली रुबीना सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनव शुक्ला आणि रूबीनाने ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र काम केले. शो दरम्यान दोघांचे संबंध चांगले नसल्याचे उघड करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर दोघांनीही घटस्फोट घेण्याचा विचार केला. मात्र, रुबीनाला ‘बिग बॉस’ची ऑफर मिळाली आणि बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्यांचे बॉंडिंग चांगले झाले आहे.

रुबीनाने नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत सांगितले की, “अभिनवसोबत मला असुरक्षित वाटायचे. मी चांगली आहे का?” ती म्हणते, “तुमच्या सर्वांसाठी तो एक चांगला व्यक्ती असेल, पण माझ्यासाठी तो वेगळाच आहे किंवा माझ्या स्वत:मध्येच काही गोष्टींची कमी असेल, त्यामुळे आमच्या नात्यातील दुराव्याचे कारण हेही असू शकते. आपला जोडीदार सुंदर, आणि सर्वगुण संपन्न व्यक्ती असावा.”

रुबीनाने नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत सांगितले की, तिला अभिनवबाबत असुरक्षित वाटायचे. ती म्हणाली, “असुरक्षितता तुम्हाला स्वत: बाबत असते. मी तेवढी चांगले नसेल, किंवा असेही असू शकते की, समोरच्या व्यक्तीसाठी तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार असू शकतो. कदाचित माझ्यात कमतरता असेल. कदाचित ही माझी चूक असेल, ज्यामुळे हे नाते पुढे जात नाही. तुम्हाला वाटू लागते की, तुमच्या जोडीदारासाठी तुमच्यापेक्षा जास्त सुंदर, सुसंगत व्यक्ती असू शकतो. असेही असू शकते की, जे त्याला खुश ठेवू शकेल. ही असुरक्षितता तुमच्या वागण्यावर परिणाम करते की, तुम्ही कोणत्या परिस्थितीत कशाप्रकारे प्रत्युत्तर देता. तरीही मला अभिनवने कधीच असुरक्षित वाटू दिले नाहीये.”

याआधीही तिने सांगितले होते की, ती अभिनवला इम्प्रेस करण्यासाठी त्याच्या घरी फेऱ्या मारायची. अनेकदा ती त्याला भेटण्यासाठीच कॉलनीतून जात असाची. मात्र, असे सांगायची की, तेथून जात होती, तर म्हणलं भेटून जावं.

झी टीव्हीवरील ‘छोटी बहू’ या मालिकेमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री रुबीना लोकप्रिय झाली. रुबीना सध्या ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’मध्ये काम करत आहे. त्यातील तिची भूमिका प्रचंड मेहनती आणि प्रभावशाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा