Monday, May 13, 2024

‘बिग बॉस १५’मध्ये अभिजीत बिचुकलेच्या ‘या’ कृत्यावर भडकला सलमान खान, ‘वीकेंड का वार’मधून दिले हाकलून

‘बिग बॉस १५’मध्ये दिसणारे स्पर्धक त्यांच्या खेळापेक्षा जास्त भांडणामुळे चर्चेत असतात. या यादीत अभिजीत बिचुकलेच्या (Abhijeet Bichukle) नावाचाही समावेश आहे. अभिजीत या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल झाला होता. शोमध्ये आल्यानंतरच अभिजीत त्याच्या मारामारी आणि वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे त्याला अनेकदा सलमान खानच्या (Salman Khan) रोषालाही सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी आता अभिजितने ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानसमोर असे कृत्य केले होते, त्यानंतर सलमानने त्याला ‘वीकेंड का वार’मधून हाकलून दिले.

‘वीकेंड का वार’मध्ये धमाका केल्यानंतर सलमानने कुटुंबातील सदस्यांची शाळा घ्यायला सुरुवात केली. यादरम्यान सलमान घरातील कार्य रद्द झाल्यामुळे घरातील सदस्यांना खरे-खोटे ऐकवत होता, मात्र यादरम्यान अभिजीत आळस देताना दिसला.

झाले असे की, सलमान उमर रियाजशी (Umar Riaz) बोलत होता. ‘टिकीट टू फिनाले’ टास्कमध्ये तो योग्यरित्या का सहभागी झाला नाही, हे उमर रियाजकडून सलमान जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान अभिजीत उमर रियाजच्या जवळ बसला होता आणि बसलेल्या अवस्थेत त्याला आळस येऊ लागला. अभिजीतचे हे कृत्य पाहून सलमान भडकला.

सलमान अभिजीतवर ओरडला आणि म्हणाला की, “अभिजीत उभा रहा आणि जा इथून.” याच्या पुढे सलमान म्हणतो की, “मी इथे उभा आहे आणि तुला झोप येत आहे. जा इथून.” पण जेव्हा अभिजीत जाण्यास नकार देतो, तेव्हा सलमानचा आवाज मोठा होतो, त्यामुळे अभिजीत तिथून निघून जातो.

मात्र, खोलीत गेल्यावर अभिजीत दारात उभा राहून सलमान काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करतो. पण सलमान अभिजीतला तिथेही उभे राहू देत नाही. तो अभिजीतला आत जाऊन झोपायला सांगतो. यादरम्यान घरातील इतर सदस्यही अभिजीतला सलमानची आज्ञा मानण्यास सांगतात, त्यानंतर अभिजीत आत जाऊन बेडवर झोपतो.

अभिजीत बिचुकलेच्या या चुकीमुळे सलमान खान कुटुंबीयांशी बोलेपर्यंत तो खोलीतच राहतो. मात्र, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया घरात प्रवेश करतात तेव्हा अभिजीत बिचुकले बाकीच्यांसोबत बागेत हजर होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा