Saturday, April 18, 2026
Home अन्य जंगलात राहणाऱ्या सदस्यांची अवस्था झालीय दयनीय, ‘बिग बॉस’ने हिसकावून घेतलं सगळं सामान

जंगलात राहणाऱ्या सदस्यांची अवस्था झालीय दयनीय, ‘बिग बॉस’ने हिसकावून घेतलं सगळं सामान

नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या १५व्या सीझनची सुरुवातही दमदार झाली आहे. घरात सुरुवातीलाच अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. महत्वाचे म्हणजे, सीझन सुरू होण्यापूर्वीच सलमान खानने घरातील सर्व स्पर्धकांना इशारा दिला होता की, त्यांच्यासाठी या घरात टिकून राहणे खूप कठीण होणार आहे. त्यानुसार, कुटुंबातील सदस्यांना बिग बॉसच्या जंगलात प्रवेश घेण्यापूर्वी अनेक परीक्षेतून जावे लागले. आता बिग बॉसमधील रहिवाशांना केवळ जंगलातच राहावे लागत नाही, तर अनेक गोष्टींचा त्याग देखील करावा लागला.

घरात राहण्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम
जंगलात राहणाऱ्या सदस्यांना बिग बॉसच्या आलिशान घरात राहण्यासाठी कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पण सर्वांना माहीत आहे की, बिग बॉसच्या घरात सतत नवे ट्विस्ट दिसतात. अशा परिस्थितीत, दुसऱ्याच दिवशी कुटुंबातील सदस्यांना घरात राहण्यासाठी, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी अनेक अडचणींवर मात करावी लागेल. त्यानंतरच त्यांना बिग बॉसच्या जंगलामधून घरात प्रवेश मिळेल. (bigg boss 15 contestants shamita shetty and pratik sehajpal took everyones clothes and thing after order)

बिग बॉसने हिसकावून घेतलं सामान
दुसऱ्याच दिवशी बिग बॉसने जंगलात राहणाऱ्या सर्व स्पर्धकांकडून त्यांचं सामान हिसकावून घेतलं आहे. खरं तर, बिग बॉसने सर्व सदस्यांना त्यांच्या गरजेचे सामान आणि कपड्यांची जोडी वगळता, त्यांचे सर्वकाही बिग बॉसच्या घरात बांधलेल्या जंगल गुहेत ठेवण्याचे आदेश दिले. हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी बिग बॉसच्या आलिशान घरात राहणाऱ्या सदस्यांना दिली गेली आहे.

घरात सुरू झाली भांडणं
बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून वादाला सुरुवात झाली आहे. कुटुंबातील सदस्य एकमेकांना नीट ओळखतही नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये खूप भांडणं पाहायला मिळत आहेत. जय भानुशाली आणि प्रतीक सहजपाल यांच्यात स्वच्छतेवरून भांडण झाले, तर दुसरीकडे अफसाना आणि विधी यांच्यातही मोठा वाद झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा