Bigg Boss 15: ‘मृत्यूची चेष्टा करू नका…’, टास्कमध्ये शवपेटी वापरल्यामुळे निर्मात्यांवर भडकले युजर्स


सलमान खानचा शो ‘बिग बॉस १५’ची सुरुवात अतिशय दमदार झाली होती. पण हळूहळू हा रियॅलिटी शो टीआरपीच्या यादीत खाली घसरताना दिसत आहे. वाद, प्रेम, भांडण, टास्क, सगळं काही या सीझनमध्ये पाहायला मिळतंय. मात्र त्यानंतरही या शोला चाहत्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत शोचे निर्माते शो अधिक रंजक बनवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. यामुळे निर्मात्यांनी शोमध्ये नवा ट्विस्ट आणला आहे.

शवपेटी पाहून भडकले युजर्स
बिग बॉसने घोषणा केली की, जो कोणी सदस्य घराबाहेर होईल, म्हणजेच एलिमिनेट होईल, त्याला शवपेटीमध्ये नेले जाईल. याचा एक प्रोमो व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्व स्पर्धक बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर एक शवपेटी ठेवली आहे. यासोबतच असे सांगण्यात आले आहे की, स्पर्धकांपैकी कोणा एकाला घराबाहेर काढले जाईल, हा निर्णय कुटुंबातील सदस्यांना घ्यावा लागेल. (bigg boss 15 netizens slams show makers for using coffin for elimination task)

मात्र, या व्हिडिओमध्ये दिसणारी शवपेटी पाहून अनेक युजर्स नाराज झाले आहेत. एका युजरने लिहिले की, “अलीकडेच कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला आणि अजूनही अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे मनोरंजनात अशा प्रकारचा विनोद करणे योग्य नाही.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “खरंच, शवपेटी? मनोरंजनाच्या नावावर आता हेच उरलं आहे का?” एक युजर म्हणतोय की, “मृत्यूची चेष्टा करू नका.” तर एकाने लिहिलंय, “केवळ मृतांना शवपेटीमध्ये नेले जाते, त्यामुळे एलिमिनेशन टास्कसाठी शवपेटी वापरणे अत्यंत लाजिरवाणे आहे. या कठीण काळात अशा प्रकारचे मनोरंजन करू नये.”

सोमवारी (२२ नोव्हेंबर) एका एलिमिनेशन फेरीत, सिंबाला घरातून बाहेर काढण्यात आले. या आठवड्यात सिंबा नागपालला त्याच्या कामगिरीच्या जोरावर कुटुंबीयांनी बेघर केले. शिवाय अलीकडेच, बिग बॉसच्या घरात उमर रियाझ आणि सिंबा नागपाल यांच्यात जोरदार भांडण झाले होते. हिंसक झाल्यामुळे बिग बॉसने त्याला ताकीद देऊन घरात राहू दिले, परंतु त्याला व्हीआयपी शर्यतीतील सदस्य होण्यापासून काढून टाकले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट


Latest Post

error: Content is protected !!