Monday, June 24, 2024

Bigg Boss 15: तेजस्वी अन् करणच्या नात्यावर रितेशने उठवले प्रश्नचिन्ह, म्हणाला, ‘हे ‘Fake’ आहे’

‘बिग बॉस १५’चा आठवा आठवडा संपणार आहे. मात्र या आठवड्याच्या अखेरीस वाईल्ड कार्ड एन्ट्री आल्याने घरात बरेच बदल दिसून आले. वाइल्ड कार्ड एन्ट्री गैर-व्हीआयपी सदस्यांना लक्ष्य करत आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीही ‘वीकेंड के वार’मध्ये सलमान खानसमोर बराच ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी व्हीआयपी सदस्यांना घरातील इतर ७ सदस्यांचा पर्दाफाश करण्याची संधी देण्यात आली. जिथे शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, उमर रियाझ आणि करण कुंद्रा बहुतेक घरातील सदस्यांच्या निशाण्यावर होते.

रितेशने उपस्थित केले तेजस्वी-करणच्या नात्यावर प्रश्न
एकीकडे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशने रितेशचे दमदार स्वागत केले. तर दुसरीकडे, रितेशने उमर तेजस्वी आणि करणला घरातील सर्वात बनावट स्पर्धक म्हटले. यावेळी रितेशने त्यांच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित केले. राखी सावंतने तेजस्वी प्रकाशला घरातील सर्वात कंटाळवाणी स्पर्धक म्हटले, पण तिचा पती रितेशने तेजस्वी आणि करणच्या नात्याला खोटे असल्याचे सांगितले. (bigg boss 15 rakhi sawant husband ritesh called tejasswi prakash and karan kundrra relationship fake)

‘या’ कारणामुळे दोघांचे नाते वाटले फेक
रितेशने स्पष्टीकरण देताना सांगितले की, तो आल्यापासून करण आणि तेजस्वीकडे लक्ष देत आहे. हे दोघे जेव्हा एकत्र असतात तेव्हा फक्त खेळाबद्दलच बोलतात. त्यांचे एकमेकांवर खरेच प्रेम असते, तर ते एकमेकांशी प्रेमाबद्दल बोलले असते. पण दोघेही केवळ खेळाबद्दल बोलतात. यासोबतच रितेशने आरोप केला की, त्याला या दोघांमध्ये प्रेम दिसत नाही.

करणवर आहे प्रेम!
एकीकडे करण कुंद्राने तेजस्वीला सांगितले आहे की, तो तिला पसंत करतो. तर दुसरीकडे तेजस्वीने राखी सावंतसमोर उघडपणे सांगितले की, तिचे करणवर प्रेम आहे आणि याविषयी तिला कोणाला काही समजवायची गरज नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा